हेरले /प्रतिनिधी
दि.१२/८/२०
अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त कावळा नाका ते शिरोली परिसरातील मूर्तिकार, कारागीर उद्योजकांना फळे वाटप करण्यात आले, ऐन पावसाळ्यात व कोरोनाच्या संकटकाळात छोटे उद्योजक व कारागीर यांची भेट घेऊन संदीप मोहिते पाटील यांनी वाढदिवसानिमित्त फळे वाटप करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
शिरोली येथे राज्यमंत्री नाम. बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार चित्रपट संघटनेचे राज्याध्यक्ष, चित्रपट निर्माते ,लेखक संदीप मोहिते - पाटील यांचा वाढदिवसानिमित्त चित्रपट नाट्य कलाकार दगडू माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,
यावेळी प्रहार चित्रपट संघटनेचे कोल्हापूर जिल्हा संघटक दगडू माने, सिने-नाट्य कलाकार राजेंद्र प्रधान, कलाकार डी वाय माळी , नीरज कलावंत, सागर डपाले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
मुर्तिकार कारागीरींना फळे वाटप करतांना संदिप मोहिते दगडू माने व अन्य मान्यवर.
No comments:
Post a Comment