Monday, 3 August 2020

गडमुडशिंगी मध्ये अण्णाभाऊ साठे शताब्दीजयंती उत्साहात


गडमुडशिंगी ता. करवीर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची शताब्दी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीचा मुख्य उत्सव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर गडमुडशिंगी येथे गडमुडशिंगीचे सरपंच जितेंद्र यशवंत, उपसरपंच तानाजी पाटील यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी पांडुरंग कांबळे, संजय सातपुते ,कृष्णात रेवडे , गितेश डकरे, संभाजी दाभाडे, मातंग समाजातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment