नंदुरबार - ( प्रतिनिधी - वैभव करवंदकर ) - - - -
निर्धार स्वातंत्र्य दिनाचा.. कोरोना मुक्त करण्यासाठी नियम पाळा कोरोना टाळा, सुरक्षेसाठी मास्कचा वापर करा. वन्दे मातरम् .. भारत माता की जय आदी घोषणांच्या निनादात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील बालवीर चौकात शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सामाजिक अंतर ठेवून व मास्कचा वापर करीत सेवानिवृत्त शिक्षक जी. एस. गवळी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. तत्पूर्वी हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्या प्रतिमेस शालेय विद्यार्थी धिरेन हिरणवाळे व भारत मातेच्या प्रतिमेस वैष्णवी सुभाष उदीकर या चिमुकल्यांनी पुष्पहार अर्पण केले. राष्ट्रगीतानंतर उपस्थितांनी तिरंग्यास सलामी दिली. याप्रसंगी कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आलेले सन्मान पत्र व सन्मान चिन्ह ठेवण्यात आले होते. ध्वजारोहणानंतर जी. एस. गवळी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ हात धुणे बाबतीत प्रात्यक्षिक देखावा सादर करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त पर्यावरणाचा संदेश देत चिमुकल्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी सांगितले की, कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वानी संघटितपणे कार्य करुन शासन नियमांचे पालन करावे. या छोटेखानी कार्यक्रमास प्रा. एकनाथ हिरणवाळे, मोतीलाल नुकते, नितिन तावडे, सदाशिव गवळी, सौ. विमल हिरणवाळे, सौ. नंदा हिरणवाळे तसेच कु. लिना हिरणवाळे, भाग्यश्री हिरणवाळे, चैताली हिरणवाळे, नेहल चौधरी, कावेरी चौधरी, गोपाल हिरणवाळे कृष्णा चौधरी, विशाल हिरणवाळे आदी विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment