Sunday, 9 August 2020

शिरोळ तालुका शिवसेनेच्यावतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन

सैनिक टाकळी प्रतिनिधी
शिरोळ तालुका शिवसेनेच्यावतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून जाहीर निषेध करण्यात आला.
बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुका मणगुत्ती गावात २ दिवसांपूर्वी अश्वारूढ श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. पण तेथील काही स्थानिक लोकांनी आणि तथाकथित प्रादेशिक  संघटनांनी या प्रतिष्ठापणेला तीव्र विरोध केला आणि कर्नाटक प्रशासनाने त्यांचीच बाजू घेत  ही मूर्ती चौथऱ्यावरून हटवली . याचा निषेध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुका शिवसेना  आज हे आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना उप जिल्हाप्रमुख मधुकर पाटील , युवा सेनेचे तालुका प्रमुख  प्रतीक धनवडे,  संतोष धनवडे ,बाबासो सावगावे , अमित कदम, यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते

No comments:

Post a Comment