Sunday, 9 August 2020

कृषी पंपाच्या विज कनेक्शन संदर्भात संभाजी ब्रिगेड च्या वतीने निवेदन.

 कोल्हापूर प्रतिनिधी 
मागील काही वर्षांपासून शेतीसाठी विज कनेक्शन देणे बंद करण्यात आले होते. यामुळे शेती व शेतकरी यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाच्या धोरणात्मक निर्णयाने शेतीसाठी विज कनेक्शन बाबत अडथळे निर्माण झाले आहेत.
एचव्हीडीएस पद्धतीने कनेक्शन देत असल्याने प्रत्येकास वेगवेगळे ट्रान्सफार्मर जोडले जाणार आहेत.ही बाब उपयोगी असेल परंतू सध्या कृषी पंपाच्या मागणीची यादी मोठी आहे. जिथे शिल्लक लोड / विज असेल त्या डिपी वरुन मागणी प्रमाणे अर्जदारांना विज कनेक्शन देणे आवश्यक आहे. तसेच जेथे नव्याने एचव्हीडीएस कनेक्शन कृषी पंपांना दिले आहे त्यापैकी शिल्लक विज असलेल्या ट्रान्सफार्मर वरुन आजूबाजूच्या शेतकऱ्यांना  विज देणे गरजेचे आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये पुरेशी वीज उपलब्ध असूनही तसेच मागणी असूनही महावितरणकडून कडून शेतीपंपांना वीज दिली जात नाही. यामध्ये शेतकऱ्यांचे व  आपल्या कंपनीचेही आर्थिक नुकसान आहे.
 तरी आपल्या सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून दोघांचे होणारे नुकसान थांबवावे व महाराष्ट्राच्या सर्वागिन विकासामध्ये भर टाकणाऱ्या शेतीला , शेतकऱ्यांना न्याय द्यावा.

कोविड 19 साथ रोगाने सारा देश लॉकडाऊन असल्याने सर्वच घटक आर्थीक संकटात सापडले आहेत. लॉकडाऊन नंतर परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत  एचव्हीडीएस योजना तात्पुरती बंद करून शेतकऱ्यांना वीज कनेक्शन द्यावेत. 

कृपया वाढती बेरोजगारी यावर हा एक छोटासा उपाय ठरू शकतो. कृषी पंपाच्या तात्काळ विज कनेक्शन मुळे विविध घटकांना रोजगार मिळेल तसेच शेती व शेतकरी यांना देखील सक्षम केले पाहिजे. यावर तातडीने शासन स्तरावर निर्णय घ्यावेत. असे निवेदनात म्हटले आहे यावर रुपेश पाटील 
संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष कोल्हापूर
अभिजीत कांजर अभिजीत भोसले निलेश सुतार शाहबाज शेख भगवान कोईगडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

No comments:

Post a Comment