Thursday, 6 August 2020

यल्लमा मंदिर नाल्यामुळे रस्त्यावर येणारे पाणी झाले बंद ...

कंदलगाव ता. ५
     आयटी पार्क परिसरातून मोठया प्रमाणावर येणारे गटारीचे पाणी यल्लमा मंदिर चौकात चेंबरमधून उमटून बाहेर पडल्याने या चौकात नेहमीच ड्रेनेजच्या पाण्यामुळे पादचारी व महिला प्रवाशांची कसरत होत होती.
     गेल्या सात महिण्यापूर्वी प्रवाशांच्या मागणी नुसार मोठा नाला कॉक्रीटीकरण करून बांधल्याने सध्या या ठिकाणी चेंबरमधून पाणी वर आले नसल्याने प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

कोट -संबधीत चौकात थोडा जरी पाऊस पडला तर ड्रेनेज तुंबून रस्त्याने पाणी वाहत असायचे. गेल्या सात महिन्यापूर्वी या ठिकाणी बांधण्यात आलेल्या नाल्यामुळे रस्त्यावर पाणी आलेले नाही.
रमाकांत देसाई , प्रवाशी .
फोटो  = यल्लमा मंदिर चौकातील नाल्यामुळे रस्त्यावर पाणी आले नाही .
( छायाचित्र - प्रकाश पाटील )

No comments:

Post a Comment