Saturday, 8 August 2020

श्रावण सोमवारी भरणारी मल्लेपा बेटाची यात्रा रद.

उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे 

बालाघाटच्या डोंगर रांगेच्या पायथ्याला उदगीर व चाकुर या दोन तालुक्याच्या सिमेवर वसलेले मल्लेपा हे मंदिर किनी यल्लादेवी गावा पासुन वाढवणा पाटी ते चाकुर या रोड लगत   बेटावर बसले आहे  दरवर्षी श्रावण महिन्यातील सोमवारी भावीक मोठ्या  संख्येने दर्शनाला येत असतात तसेच या परिसरातील श्रावण महिन्यातील सर्वात मोठी यात्रा भरते. मात्रं यंदा कोरोना या महामारी आजारामुळे येथील यात्रा रद्द झाली आहे.या बेटावरील यात्रेसाठी व दर्शनासाठी भाविक लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्र, तेलंगणा,आंध्रप्रदेश,कर्नाटक राज्यातुन मोठ्या संख्येने येत असतात.विविध धार्मिक कार्यक्रम, पूजाअर्चा,कुस्ती या सारख्या कार्यक्रम होत असतात.परंतु यात्रा भरण्यावर सध्या बंदी घालण्यात आली असल्याने भावीकांची नाराजी झाला आहे.
दरवर्षी श्रावणातील तिसऱ्या सोमवारी बेटावरती खुप मोठी यात्रा भरते व  लाखो भाविक यात्रेत सहभागी होतात.पण या वर्षी बेटावर असे चित्र पहायला या वर्षी तरी मिळणार नाही असी चर्चा भावीकातुन व्यक्त होत आहे.

.............प्रतिक्रिया.................
या संदर्भात वाढवणा पोलीस ठाण्याचे साह्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांना विचारणा केली असता त्यांनी भावीक भक्तानी या श्रावण महिन्यात कुठे ही न जाता घरी राहुन श्रावण मास भक्ती पुजण उपवास करावे व सुरक्षित राहावे व कोरोणा या महामारी आजारापासुन दुर रहावे असे अव्हाण ही त्यानी बोलताना केले.

No comments:

Post a Comment