हेरले / प्रतिनिधी
प्रशांत तोडकर
: कोल्हापूर जिल्हयात कोरोना बाधीतांची वाढती रूग्नसंख्या आणि पाॅझिटीव्ह रूग्नांना वेळेत उपचार करून त्यांचा जीव वाचविण्यासाठी उद्योजक आणि औद्योगिक संघटनाकडून प्रशासनाला व्हेंटिलेटर्स प्रदान करण्यात आले. उद्योजक आणि औद्योगिक संघटनाकडून एकूण २० व्हेंटिलेटर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी आज पहिले तीन व्हेंटिलेटर्स मे. शिरगावकर ग्रुप आॅफ इंडिस्ट्ज, मे. घाटगे-पाटील ग्रुप आॅफ इंडस्ट्जि आणि कोल्हापूर उद्यम को. आॅप सोसायटी यांच्यावतीने पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
जिल्हा प्रशासनास मदत आणि आरोग्य यंत्रेणेवरील ताण कमी करण्यासाठी उद्योजक आणि औद्योगिक संघटनांकडे व्हेंटिलेटर्स देण्याची मागणी केली होती. कोल्हापूरातील कोरोना बाधीत रूग्नांवर वेळेत उपचार करण्यासाठी डाॅक्टर्स, प्रशासन आणि पोलिस यंत्रणेबरोबरच कोव्हीड योध्ये होण्यामध्ये उद्योजक आणि औद्योगिक संघटनांनीही पुढाकार घेतला आहे.
उर्वरित सतरा व्हेंटिलेटर्सही लवकरच देण्यात येणार आहेत असा विश्वास गोकूळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सचिन शिरगावकर यांनी व्यक्त केला. दानशूर कोल्हापूरकरांची परंपरा सांभाळत उद्योजकांनीही प्रशासनाला मदतीचा हात दिला आहे असे गौरवोद्गार मंत्री सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. या व्हेंटिलेटर्स मुळे अत्यावश्यक रूग्नांवर वेळेत उपचार करणे शक्य होणार आहे. कोरानामुळे कोल्हापूरातील वाढत असलेला मृत्यु दर कमी करण्यासाठी याची खुप मदत होईल.
यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश आबीटकर, महापौर सौ. निलोफर आजरेकर, आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी, उद्योजक सचिन शिरगावकर, सोहन शिरगावकर, अतुल पाटील, चंद्रकांत चोरगे, नितीन वाडीकर, दिनेश बुधले, अशोक जाधव, संगीता नलवडे आदी उपस्थित होते.
.
फोटो
कोल्हापूर : उद्योजक आणि औद्योगिक संघटनाकडून पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे व्हेंटिलेटर्स प्रदान करताना उद्योजक सचिन शिरगावकर, शेजारी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश आबीटकर, महापौर सौ. निलोफर आजरेकर, आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी आदी
.
No comments:
Post a Comment