*उदगीर (प्रतिनिधी) गणेश मुंडे
उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने सोमवार दि.२१ आॅगस्ट रोजी सकाळी १० वा. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने वर्षातून दोन वेळा 6 जानेवारी दर्पण दिना निमित्य व ब्लड बॅकेत जेव्हा रक्ताचा तुटवडा निर्माण होतो,अशावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.सध्या कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव उदगीर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत असून,उपचारासाठी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे.त्यामुळे रक्ताची मागणी वाढत आहे.परंतू, ब्लड बँकेत मागणी जास्त व पुरवठा कमी असल्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असल्याने उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने रक्ताची गरज लक्षात घेता शुक्रवार दिनांक २१ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता नगर परिषद व्यापारी संकुल समोरिल प्रांगणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी उदगीर शहर व परिसरातील इच्छुक रक्तदात्यानी रक्तदान करुन रक्तदानाच्या राष्ट्रीय सामाजिक कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने केले आहे.
No comments:
Post a Comment