Friday, 28 August 2020

शिस्त पालन न केल्यास कोरोना हॉटस्पॉट होणार

सैनिक टाकळी प्रतिनिधी

 सैनिक टाकळी तालुका शिरोळ येथील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक बाब असल्याने लोकांनी शिस्तीचे पालन न केल्यास भविष्यामध्ये गाव हॉटस्पॉट मध्ये जायला वेळ लागणार नाही . गावामध्ये ज्यावेळी कोरोना चे रुग्ण नव्हते. त्यावेळी गावाने स्वयंशिस्त पाळली होती. दक्षता कमिटीनी घालून दिलेल्या नियमांचे पालन देखील केले होते. गावाच्या वेशीवर ती चेक पोस्ट ठेवून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नोंदी ठेवल्या होत्या यामुळे गावामध्ये एकही रुग्ण आढळून आला नव्हता. परंतु अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर परिस्थिती बदलत गेली . आज अखेर सुमारे दहा पेक्षा जास्त ही रुग्ण आढळले असून त्यामध्ये पाच लोकांचा मृत्यू झाल्याने लोक भीतीच्या छायेखाली आहेत. सध्या  वातावरणातील बदलामुळे काही लोक सर्दी तापाने आजारी पडत आहेत. दरम्यान गावांमध्ये समूह संसर्ग झाल्याने नेमके आजारपण कशाचे या द्विधा अवस्थेत लोक आहेत. गावातील अनेकांचे मृत्यू हे नैसर्गिक की कोरोना याचे स्पष्टीकरण नसल्यामुळे  अंत्यविधी वेळी अनेकांचा संपर्क येत आहे . सध्या पुराने दिलासा दिला असला तरी कोरोना ने डोके वर काढल्याने या संकटाचा सामना सामुहिक रित्या करावा लागणार आहे  दानवाड दत्तवाड राजापूर खिद्रापूर राजापूर वाडी या गावामध्ये सुद्धा सध्या रुग्ण  आढळत असून या परिसरातील गावांसाठी मध्यवर्ती ठिकाणी कोविड सेंटर सुरू व्हावे . जेणेकरून अत्यवस्थ रुग्णांना वरती तात्काळ उपचार होतील अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

No comments:

Post a Comment