गडमुडशिंगी (प्रतिनिधी दीपक गुरव)
गडमुडशिंगी (ता.करवीर )येथील त्रिशूल फ्रेंड सर्कलने इम्युनिटी बूस्टरचे वाटप करून समाज प्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली.सुमारे चारशे ग्रामस्थांनी इम्युनिटी बूस्टर चा लाभ घेतला .
त्रिशूल फ्रेंड सर्कल नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे.या कोरोना महामारी मध्ये लोकांना आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी इम्युनिटी बूस्टरचा उपयोग होत आहे.अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज (कणेरी)यांच्या मार्गदर्शनाखाली बंगळुरू येथील डॉक्टरांनी या इम्युनिटी बूस्टरची निर्मिती केली आहे.
या सामाजिक कार्यासाठी ग्रामस्थांनी अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज आणि त्रिशूल फ्रेंड सर्कलचे आभार मानले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष आणि मंडळाचे कार्यकर्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
फोटो
गडमुडशिंगी(ता.करवीर)येथे इम्युनिटी बूस्टर वाटप प्रसंगी त्रिशूल फ्रेंड सर्कल चे कार्यकर्ते
No comments:
Post a Comment