दि.10/9/20
हेरले ( ता. हातकणंगले ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत हेरले माले चोकाक अतिग्रे मुडशिंगी रुकडी या सहा गावातील बुधवार पर्यंतची एकूण कोरोना रूग्ण संख्या २८७ होती. या संख्ये पैकी २२३रूग्णांचा डिस्चार्ज झाला आहे. मृत रुग्ण १५ असून उपचार घेणारे रुग्ण संख्या ४९ आहे. अशी माहिती वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
हेरले गावची बुधवार पर्यंतची एकूण रूग्ण संख्या - दैनिक -४, प्रगतीवर -११६पैकी , डिस्चार्ज -दैनिक ५ प्रगतीवर-८९, मृत्यू -४, उपचार घेत आहेत -घोडावत कोविड सेंटर -११, सीपीआर -०, खाजगी हॉस्पीटल-३, घरी उपचार - ९, एकूण शिल्लक -२३, कॉन्टेनमेंट एकूण झोन -२० ,सुरू - ९ बंद -११
माले गावची बुधवार पर्यंतची एकूण रूग्ण संख्या दैनिक -०, प्रगतीवर -१५पैकी, डिस्चार्ज -दैनिक ०, प्रगतीवर-१४, मृत्यू -१, उपचार घेत आहेत - घोडावत कोविड सेंटर -०, सीपीआर -०, खाजगी हॉस्पीटल-०, घरी उपचार - ०, एकूण शिल्लक -०, कॉन्टेनमेंट एकूण झोन -३ ,सुरू - ३ बंद -०
चोकाक गावची बुधवार पर्यंतची एकूण रूग्ण संख्या - दैनिक -०, प्रगतीवर -६पैकी डिस्चार्ज -दैनिक ०, प्रगतीवर-२, मृत्यू -१, उपचार घेत आहेत -घोडावत कोविड सेंटर -१, सीपीआर -१, खाजगी हॉस्पीटल-१, घरी उपचार - ०, एकूण शिल्लक ३, कॉन्टेनमेंट एकूण झोन -५ ,सुरू - ३, बंद -२
मुडशिंगी गावची बुधवार पर्यंतची एकूण रूग्ण संख्या - दैनिक -०, प्रगतीवर -११पैकी डिस्चार्ज -दैनिक ०, प्रगतीवर-७, मृत्यू -०, उपचार घेत आहेत -घोडावत कोविड सेंटर -४, सीपीआर -०, खाजगी हॉस्पीटल-०, घरी उपचार - ०, एकूण शिल्लक ४, कॉन्टेनमेंट एकूण झोन -३ ,सुरू - ३ बंद -०
अतिग्रे गावची बुधवार पर्यंतची एकूण रूग्ण संख्या - दैनिक -०, प्रगतीवर -२४ पैकी डिस्चार्ज -दैनिक ०, प्रगतीवर-२१, मृत्यू -२, उपचार घेत आहेत -घोडावत कोविड सेंटर -०, सीपीआर -०, खाजगी हॉस्पीटल-०, घरी उपचार - १, एकूण शिल्लक १, कॉन्टेनमेंट एकूण झोन -७ ,सुरू - १ बंद -६
रूकडी गावची बुधवार पर्यंतची एकूण रूग्ण संख्या - दैनिक -१, प्रगतीवर -११५ पैकी डिस्चार्ज -दैनिक ५, प्रगतीवर-९०, मृत्यू -७, उपचार घेत आहेत -घोडावत कोविड सेंटर -१७, सीपीआर -०, खाजगी हॉस्पीटल-१, घरी उपचार - ०, एकूण शिल्लक १८, कॉन्टेनमेंट एकूण झोन -१७ ,सुरू -६, बंद -११ आदी संख्या असून हेरले परिसरामध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून गंभीर समस्या निर्माण झाली आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या लक्षणिय असली तरी मृत्यूच्या प्रमाणामुळे समस्या गंभीर बनली आहे. सामुहिक संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रभावी उपाय योजना कार्यान्वीत करून गावे कोरोना मुक्त करण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे बनले आहे.
समुह संसर्ग झपाट्याने वाढल्याने पन्नास वर्षावरील नागरिकांनी घरीच राहावे, थंडी ताप सर्दी खोकला असणाऱ्या रूग्णांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रातून औषधोपचार घ्यावा, वारंवार हात धुवावेत, लठ्ठपणा, मधुमेह , ह्रदयरोग, किडणी आजार आदी रूग्णांनी स्वतःची काळजी घ्यावी, अत्यावश्यक कामाशिवाय घरातून बाहेर पडू नये, सर्व नागरिकांनी कोरोना मुक्त गाव करणेसाठी आरोग्य विभागास सहकार्य करावे असे आवाहन वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल देशमुख यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment