हेरले / प्रतिनिधी
दि.28/9/20
दिल्ली नवोदित साहित्यकार मंच दिल्ली व सोसाइटी फॉर यूथ डेवलपमेंट (रजि.) २०१९ यांच्या मार्फत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी व त्याना यथोचित मान देण्यासाठी त्यांना महात्मा ज्योतिबा फुले सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील साजणी गावचे सुपुत्र कवी व लेखक प्रा. सचिन कांबळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
सध्या ते संजय घोडावत पॉलिटेक्निक अतिग्रे मध्ये रसायनशास्त्र विभागात अधिव्याख्याता, युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र व कर्नाटकचे कोल्हापूर जिल्हा संघटक आणि साहित्यानंद प्रतिष्ठान, कोल्हापूर, जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याने समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. संजय घोडावत विद्यापीठ चे अध्यक्ष संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले प्राचार्य विराट गिरी यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment