कसबा बावडा प्रतिनिधी
को.म.न.पा.राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11,कसबा बावडा,मध्ये शैक्षणिक वर्ष 2020 -- 2021 ची पालक -- शिक्षक मिटिंग झूम च्या माध्यमातून ऑनलाईन घेण्यात आली. मिटिंगमध्ये शैक्षणिक वर्ष शाळा व विद्यार्थी यांचे संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी श्री एस के यादव, केंद्र मुख्याध्यापक अजितकुमार पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक उषा सरदेसाई, विजय माळी, बाळासाहेब कांबळे, उत्तम कुंभार,अपंग समवेशीत शिक्षण तज्ञ राजेंद्र अप्पूगडे,जिल्हा समनव्यक शकीला मुजावर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार, यांनी चर्चेत सहभाग घेतला व मार्गदर्शन केले.
पालक सभेस प्रमुख मार्गदर्शक मा प्रशासनाधिकरी एस के यादव यांनी पालक व विद्यार्थी यांना प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर च्या मार्फत व्हर्च्युअल क्लास व्हिडिओ पहावे व त्यासंदर्भात काही शंका असलेस विषय शिक्षक यांना शाळेच्या वेळेत फोन करून विचारू शकता. शैक्षणिक धोरण 2020 च्या नुसार सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणून त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आम्ही सर्व चांगल्या प्रकारे शैक्षणिक नियोजन केले आहे. शाळेतील टेक्नॉसिव्ही शिक्षक यांच्या मदतीने आम्ही 100 टक्के विद्यार्थ्यांना प्रवाहात आणत आहोत व शिक्षकांनी स्वतः तयार केलेले शैक्षणिक व्हिडीओ विद्यार्थ्यांच्या घर घरात मोबाईल च्या माध्यमातून पोहोचत आहेत. सर्व शिक्षक व्हिडीओ निर्मिती छान छान करत असलेबद्दल अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करत असताना सोशल डिस्टन्सचा वापर करावा.बाहेर जाताना मास्क चा वापर करा, सॅनिटायझर वापर करा तसेच अभ्यास करत असताना वेळेचं नियोजन करावे म्हणजे म्हणजे घरातील ताण तणाव वाढणार नाहीत असे सांगितले.,
शिक्षण तज्ञ मा इलाई मुजावर यांनी मोबाईल व रेडिओ, टी व्ही वरील शैक्षणिक कार्यक्रम खरोखरच चांगले दर्जेदार आहेत त्यांचा वापर पालकांनी आपल्या मुलांना वेळेचे नियोजन करून घरी पहावे. व त्या संदर्भात दररोज कोणता व्हिडिओ पहिला त्याचा अभ्यास घरी सोडवून शिक्षकानी केलेल्या हॉटसअप ग्रुपवर चर्चा करावी.दररोज अभ्यास आपला मुलगा करतो की नाही हे सुद्धा पहावे असे प्रतिपादन केले.
शाळेचे केंद्र मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी अभ्यासाबरोबर दिवसाची दिनचर्या कशी असावी व कोणत्या वेळी कोणता अभ्यास करावा याचे नियोजन सांगितले. कोरोनाकाळींन समस्या असतांना आपण आपल्या आरोग्यासाठी सकाळचा एक तास योगासने, योगसाधना , सूर्यनमस्कार, ध्यानधारणा, ओंकार , प्राणायाम यासारखे कोणताही जमेल तो व्यायाम करणे काळाची गरज आहे.सुंदर मनात , सुंदर विचार येतात. तसेच शुद्ध हवा, अन्न ,पाणी हे आरोग्याची गुरुकिल्ली आहे.रोजच्या आहारात पालेभाज्या, लिंबू,मोड आलेली कडधान्ये यांचा जास्तीत जास्त वापर करावा असे आहाराबद्दल मार्गदर्शन केले.
उत्तम कुंभार यांनी आभार व्यक्त करताना इंग्रजी विषयाबद्दल सोपे सोपे वाचन, शुद्ध लेखन व स्पेलिंग पाठ कसे करावेत याचे मार्गदर्शन केले.
पालक सभा चर्चेत अजय बिरणगे ,प्रशांत सराटे ,मा शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा पल्लवी पाटील,शाळा व्यवस्थापन समिती सदस्या दिपाली संतोष चौगले, निखिल सुतार,वेदांतिका पाटील, कल्पना पाटील इत्यादींनी आपली मनोगते व्यक्त केली.
शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक शिवशंभू गाटे, सुशिल जाधव, तमेजा मुजावर यांनी झूम च्या माध्यमातून यशस्वी कार्य केले.
No comments:
Post a Comment