Thursday, 15 October 2020

अंगणवाडी सेविकांचे कार्य स्तुत्य - उपसरपंच राहुल शेटे

हेरले / वार्ताहर

     सुशिक्षित व संस्कारक्षम कुटुंब व्यवस्था होणेसाठी कुटुंबामध्ये शिक्षण घेतलेल्या स्त्रीचे  महत्त्व अनन्य साधारण असते. यासाठी मुलांबरोबरच मुलींनाही शिक्षण बरोबरीचे देऊन त्यांचे शिक्षण खंडीत करू नये. त्यांच्या ध्येयापर्यंत शिक्षण देणे कुटुंबांतील सर्व घटकांची जबाबदारी आहे. शिक्षीत स्त्री संस्कारक्षम पिढी घडवते.बालवाडीपासूनच लहान मुलांना संस्काराचे धडे मिळतात त्यामुळे अंगणवाडी सेविकांचे अध्यापन कार्य स्तुत्य आहे .असे मत उपसरपंच राहुल शेटे यांनी व्यक्त केले.
       ते हेरले ( ता. हातकणंगले ) येथील महाराष्ट्र शासनाच्या " बेटी बचाओ , बेटी पढाओ " या एकात्मिक बालविकास प्रकल्प कोल्हापूर ग्रामीण अंतर्गत  अभियानाची सुरवात प्रसंगी बोलत होते.
      उपसरपंच राहुले शेटे पुढे म्हणाले मुलगा पाहिजे मुलगी नको हा विचार  काढून टाकला पाहिजे. मुलगा मुलगी समान मानून दोघांनाही शिक्षणासह सर्व क्षेत्रातील समान संधी देत उच्चपदस्थ बनविण्यासाठी प्रयत्नशिल राहिले पाहिजे.
 ११ ऑक्टोबंर जागतीक कन्यादिन निमित्त ११ ते १७ ऑक्टोबंर पर्यंत सप्ताह सुरू आहे. या सप्ताहामध्ये विविध उपक्रामांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रम प्रसंगी  अंगणवाडी सेविका व मदतनीस व पालक यांना बेटी बचाओ बेटी पढाओ संदर्भात प्रतिज्ञा देण्यात आली.
        यावेळी पर्यवेक्षिका शकुतंला कोळेकर , ग्रामपंचायत सदस्या विजया घेवारी, अंगणवाडी सेविका
शीला पोतदार,राजश्री हराळे, रेखा पाटील, संगिता उपाध्ये, नंदा थोरवत, कल्पना खोचगे, रजिया जमादार, लता शिंदे, संध्या डोरले, सुनिता खाबडे, लता कदम, मोहब्बत पेंढारी, छाया सपाटे, सपना वड्ड, फरिदा जमादार आदीसह मदतनीस व पालक उपस्थित होते.

        फोटो 
हेरले येथे बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे उद्घाटन करतांना उपसरपंच राहुल शेटे व अंगणवाडी सेविका मदतनिस आदी.

No comments:

Post a Comment