कोल्हापूर प्रतिनिधी -
कोल्हापूर शहरात लक्ष्मीपुरी येथे एलआयसी शाखा 947 समोर दिग्विजय नलवडे विकास अधिकारी यांच्या जीवन स्नेह या एलआयसी सुविधा केंद्राचे उदघाटन प्रमोद गुळवणी मॅनेजर सेल्स यांच्या हस्ते आणि शाखाधिकारी वैभव कोळी, शाखाधिकारी योगेश बलसे, सहायक शाखाधिकारी - शशिकांत जगजम्पी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या उद्घाटन प्रसंगी बोलताना गुळवणी म्हणाले की आजच्या कोरोना काळात लोकांना लवकर सर्व्हिस मिळणे गरजेचे आहे आणि या ऑफिसमधून सर्व प्रकारच्या सुविधा लोकांना मिळणार आहेत त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना विम्याबाबतच्या सर्व प्रकारच्या सुविधांसाठी या केंद्राचा फार उपयोग होईल.
लक्ष्मीपुरी 947 शाखेला संलग्न होऊन हे ऑफिस लोकांना सर्विस देत राहील तसेच नवीन पॉलिसी व एलआयसी विमा एजन्सीही या ऑफिस मार्फत घेता येईल असे प्रतिपादन शाखाधिकारी वैभव कोळी यांनी केले.
दिग्विजय नलवडे यांच्या जीवन स्नेह या केंद्रात नवीन विमा एजंट नियुक्ती व प्रशिक्षण याबरोबरच नवीन व जुन्या सर्व ग्राहकांना विमा पॉलिसी मार्गदर्शन, विमा हप्ता संकलन, पॉलिसी कर्ज प्रकरण आणि पॉलिसी संदर्भात कोणत्याही समस्या सोडविण्याची सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी आशिष पवार व नितीन जोंधळे या ऑफिस मध्ये साहाय्य करतील.
या कार्यक्रम प्रसंगी विमा प्रतिनिधी स्वाती जाधव 6 पॉलिसी, अश्विनी शिंदे 5 पॉलिसी, गीता पाटील 3 पॉलिसी, राजू खोत 3 पॉलिसी व कल्पना परदेशी 2 पॉलिसी अशा नवीन पॉलिसी संकलन करुन शुभारंभ करण्यात आला.
No comments:
Post a Comment