प्रतिनिधी सतिश लोहार
**
ज्येष्ठ पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली आणि जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त संम्पूर्ण देशभर 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर हा सप्ताह पक्षीसप्ताह म्हणून पक्षीप्रेमींकडून देशभर साजरा केला जातो.
या वर्षी देशात पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाकडून अधिकृतपणे या पक्षीसप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.याचेच औचित्य साधून आज अब्दुल लाट तालुका- शिरोळ , जिल्हा- कोल्हापूर येथे निसर्गप्रेमींकडून पक्षी निरीक्षण व पक्षी गणना कार्यक्रम राबविण्यात आला. अब्दुल लाट येथील श्री दत्त मंदिर पासून नदीकडे जाणाऱ्या रस्त्याने आढळणाऱ्या पक्ष्यांची गणना करण्यात आली. या गनणेमध्ये चित्र बलाक ,युरेशियन ऱ्हीनेक, पिवळा धोबी या परदेशी स्थलांतरित पक्षांसह राखी बगळा, जांभळा बगळा, गाय बगळे, जांभळी पाणकोंबडी, नदिसुरय, पान कावळा असे पानपक्षी तसेच इतर सामान्य 50 प्रजातींच्या असे एकूण 60 प्रजातींच्या 325 पक्षांची नोंद करण्यात आली. सदर पक्षी गणनेत अब्दुल लाट व शिवनाकवाडी येथील पक्षीमित्र श्री. प्रमोद कुंभार , डॉक्टर श्री.संतोष उमराने,श्री. ओम पाटील,श्री. संदीप वळवाडे, श्री.विनायक माळी,श्री. संतोष कोळी,श्री. शितलणाथ खोत,श्री. योगेश उमराणे, श्री. दिगंबर उमराणें, श्री. सतीश कुरणे .यांनी सहभाग नोंदवला.
No comments:
Post a Comment