हेरले / वार्ताहर
मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील जय हनुमान सह दूध संस्था व गोकुळ दूध संघ यांचे वतीने सर्व दूध उत्पादकांची सन २o१९-२० मध्ये किसान विमा पॉलिसी उतरविली आहे या विमा पॉलिसीमध्ये १३ दूध उत्पादक सभासदांना प्रत्येकी ४० हजार रुपये प्रमाणे ५ लाख २o हजार रूपये संस्थेने वाटप केले आहे.याची दखल घेऊन इन्शुरन्स कंपनी व गोकुळ दूध संघाचे संचालक मंडळाने दूध संस्थेचे आभार व्यक्त केले.
गोकुळ दूध संघाने दूध उत्पादकांच्यासाठी किसान विमा योजना राबवून दूध उत्पादकांना लाभ मिळवून दिले बद्दल संस्थेच्या वतीने माजी चेअरमन जयवंत चौगुले यांच्या हस्ते गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. जय हनुमान संस्थेचे दूध उत्पादक व संचालक श्रीकृष्ण थोरवत व राजकुमार थोरवत यांची गाय मयत झालेने विमा पॉलिसीची प्रत्येकी ४०हजार रक्कमेचा धनादेश गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक अरुण नरके व सर्व संचालक मंडळ व द न्यू - इंडिया इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी कालेकर, कानिटकर , के वाय पाटील यांचे हस्ते देण्यात आला. हातकणंगले तालुक्यामध्ये दूध उत्पादकांना जास्तीतजास्त विमा रक्कम मिळवून दिलेबद्दल जय हनुमान दूध संस्थेचा सत्कार गोकुळ संघाच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे संचालक जयवंत चौगुले, सागर थोरवत संस्थेचे सचिव आण्णासो पाटील, राजकुमार थोरवत आदी उपस्थित होते.
फोटो
गोकुळ दूध संघामध्ये माजी चेअरमन अरूण नरके यांचा जय हनुमान दूध संस्थेचे माजी चेअरमन जयवंत चौगुले सत्कार करतांना शेजारी संचालक मान्यवर.
No comments:
Post a Comment