२०४ विद्यार्थ्यांनी मिळविले ९० टक्के हुन अधिक गुण
हातकणंगले/ प्रतिनिधी
दरवर्षी प्रमाणे संजय घोडावत पॉलीटेकनिक ने आपली उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली आहे. उन्हाळी २०२० परीक्षेत २०४ विद्यार्थ्यांनी ९० टक्के गुणांपुढे मार्क्स मिळवून गुण मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
तृतिय वर्ष कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीरिंग विभागातून आदिती काईंगडे -प्रथम क्रमांक (९९.०६ % ), पार्थ भोसले व सना मोमीन - द्वितीय क्रमांक (९८.९४ % ), लक्ष्मीकांत म्हेत्रे, शुक्राना खातीब, मैथिली जाधव, सोमेश चौगुले, अनिता लवाटे- तृतीय क्रमांक (९८.८२ %) गुण मिळवून घवघवीत यश मिळविले आहे.
तृतिय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग विभागातून आकाश निर्मळे व प्रज्ञा कोठे -प्रथम क्रमांक (९८.६३% ), ऋत्विक पाटील- द्वितीय क्रमांक (९८.३८ % ), अंकिता पोवार- तृतीय क्रमांक (९८.२५ %), गुण मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
तृतिय वर्ष सिव्हिल इंजिनीरिंग विभागातून श्रद्धा माळी -प्रथम क्रमांक (९८.५६ % ), श्रेयस कलकुटगी, तुषार कोष्टी व यशराज लोंढे -द्वितीय क्रमांक (९८.४४ % ), जॉयसी कांबळे- तृतीय क्रमांक (९८.३३%), गुण मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
तृतिय वर्ष इलेकट्रॉनिक्स टेलेकॉम्युनिकेशन इंजिनीरिंग विभागातून तुषार अलासे -प्रथम क्रमांक (९८.५३ % ), अबूजेफा कुडचे - द्वितीय क्रमांक (९८ % ), सिमरन सनदी - तृतीय क्रमांक (९७.८७ %)गुण मिळवून घवघवीत यश मिळविले आहे.
मेकॅनिकल इंजनिरिंग विभागातून सोहम चौगुले -प्रथम क्रमांक (९८.२२ % ), ओंकार माळी व प्रीतम पाटील - द्वितीय क्रमांक (९७.८९ % ), मयूर जाधव व ऋतुजा सूर्यवंशी -तृतीय क्रमांक (९७.७८ %) गुण मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
या निकालाबद्दल प्राचार्य विराट गिरी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे व यापुढेही उच्चांकी निकालाची परंपरा कायम राहील अशी आशा व्यक्त केली तसेच या यशाचे श्रेय सर्व विद्यार्थी व स्टाफ यांना देऊन पालकांचे ही कौतुक केले.घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या यशाबद्दल सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment