हातकणंगले/ प्रतिनिधी
दिपक शेटे यांची पुस्तके शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना संजीवनी देणारे आहेत त्यांनी आपल्या पुस्तकात वापरलेले तंत्रज्ञान हे भविष्यातील पुस्तके निर्मितीस चालना व दिशा देणारे ठरणार आहे . दिपक शेटे यांनी आपली सर्व पुस्तके गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना कोल्हापूर येथे भेट घेऊन त्यांना पुस्तके भेट दिली त्या प्रसंगी त्यांनी हे उद्गार काढले .
दिपक शेटे हे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत . जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी आपल्या मनोगतात दीपक शेटे यांनी पदवीधर व शिक्षक निवडणुकांमध्ये केलेले योगदानाचा उल्लेख केला व त्यांच्या शैक्षणिक कार्य शुभेच्छा दिल्या .
दिपक शेटे हे गेली वीस वर्ष गणित अध्यापनाचे कार्य करत आहेत त्यांच्या शाळेचा दहावीचा गणित विषयाचा निकाल अत्यंत उत्कृष्टपणे दर वर्षी लागतो . त्यांनी गणिताची सात पुस्तके व दोन नाटके लिहिले आहेत . ते गणितात विविध उपक्रम राबवत असतात त्यांची उपक्रमशील शिक्षक म्हणून सुद्धा वेगळी ओळख आहे . दहावीची गणित पुस्तक एका पानात तयार करणारे तंत्रस्नेही म्हणून त्यांची ओळख आहे .त्यांनी अंकवेल , गणित मांडणीचे शुद्धलेखन , मॅथेमॅटिक्स रुलर्स अँण्ड फॉर्मुलाज, गणित कोश , एलईडी ,गणित नियम व सूत्रे, दहावीचे पुस्तके एका पानात अशी पुस्तके लिहिली आहे.त्यांनी किल्ली भूमितीची व रामानुजन जीवन अशी दोन नाटकेही लिहिली आहेत .महाराष्ट्र बुक रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद आहे .त्यांना आजअखेर एक राष्ट्रीय व 18 इतर पुरस्कारांनी सन्मानित केले आहे .
यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई , खासदार धैर्यशील माने , खासदार संजय मंडलिक , आम.प्रकाश आबिटकर , माजी आमदार उल्हास पाटील,जिल्हाप्रमुख विजय देवणे, मुरलीधर जाधव ,शिक्षक सेनेचे उपाध्यक्ष सतीश लोहार आदी मान्यवर उपस्थित होते .
फोटो
दिपक शेटे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना पुस्तके देताना.
No comments:
Post a Comment