Sunday, 8 November 2020

शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा संपन्न



महापालिकेच्या 35  शाळातील विद्यार्थ्यांचा सहभाग,शाळा बंद शिक्षण चालू उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर, दि.5 :-

 कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने “स्वच्छता अभियान” या विषयावर शहरस्तरीय शाळातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत महापालिकेच्या 35  शाळातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
            महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंती निमित्त कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची सोय केली आहे. विद्यार्थ्यांना घरी आभ्यासाची आवड निर्माण व्हावी, म्हणून या भाषण स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांचे आयोजन महापालिकेच्या राजर्षि शाहू विद्यामंदिर शाळा क्रं.11 कसबा बावडा येथील शाळेचे केंद्र मुख्याद्यापक अजितकूमार पाटील यांनी संयोजन केले होते. स्पर्धेचे बक्षीस वितरण कोल्हापूरनगरीच्या महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपमहापौर संजय मोहिते,स्थायी समिती सभापती सचिन पाटील,शिक्षण सभापती श्रावण फडतारे, प्रशासन अधिकारी एस.के. यादव, शैक्षणिक पर्यवक्षेक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, उषा सरदेसाई  यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शहरस्तरीय भव्य ऑनलाईन भाषण स्पर्धा " या उपक्रमात सर्वच स्पर्धकांनी प्रयत्नाची शिकस्त करून  " महात्मा गांधीजींचे स्वच्छताविषयक विचार या विषयावर मुद्देसूद भाषण सादर करून पुढील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले.
          लहान गट
प्रथम क्रमांक - सोनाक्षी सोनाप्पा गावडे
म.न.पा.टेंबलाईवाडी विद्यालय 

द्वितीय क्रमांक - अर्णव सुकेश पाटील
म.न.पा.प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर जाधववाडी

 तृतीय क्रमांक - यश सिध्दीविनायक बन्ने
म.न.पा.लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर जरगनगर.
          
             मोठा गट
प्रथम क्रमांक - देवयानी  हेमंत  बेर्डे
  म. न.पा.यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर 

द्वितीय क्रमांक - वेदांत सूकेश पाटील
म.न.पा.प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर जाधववाडी 

तृतीय क्रमांक - भार्गव गोपाळकृष्ण पोतदार
म.न.पा.वि.स.खांडेकर विद्यालय .

परिक्षक म्हणून तमेजा मुजावर, शिवशंभु गाटे,  विद्या पाटील, आस्मा तांबोळी यांनी काम पाहिले.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे शहराध्यक्ष मनोहर सरगर, राजेंद्र पाटील, दिलीप माने, वैशाली पाटील, हेमंत पाटोळे, सुजाता आवटी हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment