हेरले / प्रतिनिधी
दि.14/12/20
ऊस लागवडीचे क्षेत्र वाढतआहे पण ऊस उत्पादन वरचेवर घटत चालले आहे. घटत जाणार्या या अडचणीवर मात करायची असेल तर नव - नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे ऊसाचे उत्पादन वाढून शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. ही बाब लक्षात घेऊन छत्रपती राजाराम कारखान्याने नुकतेच छत्रपती राजाराम ऊस विकास अभियानाला सुरुवात केली आहे .
या अभियानाच्या माध्यमातून देशपातळीवर होणाऱ्या ऊस उत्पादन वाढीच्या प्रयोगाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आणि जमिनीची सुपीकता वाढवून, बियाणे निवडीपासून ऊस तोडीपर्यंत नवतंत्रज्ञानाचा वापर कसा करावा . याबाबत संपूर्ण मार्गदर्शन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचविणे हा उद्देश आहे. तो आम्ही पूर्ण करणारच असा ठाम विश्वास माजी आमदार व कारखान्याचे संचालक अमल महाडिक यांनी लाटवडे येथे बोलताना व्यक्त केला.
शेतकऱ्यांसाठी आयोजित या सभेत बोलत असताना वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट चे माजी ऊस शास्त्रज्ञ सुरेश माने - पाटील म्हणाले , उत्पादनाच्या बाबतीत जागतिक पातळीवर अनेक संशोधने झाली आहेत. या संशोधनाच्या आधारे कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना आधुनिक ऊस तंत्रज्ञान येणाऱ्या काळात कारखान्याच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. ज्यामुळे शेतकऱ्यांची भरघोस व दुप्पट ऊस उत्पादनाकडे वाटचाल होईल.
कारखान्याचे चेअरमन सर्जेराव माने म्हणाले, आम्ही ऊस उत्पादन वाढीसाठी वेगवेगळे प्रयत्न व प्रयोग करणार आहोत. त्यास ऊस उत्पादक शेतकरी राजाने सहकार्य करावे.या प्रसंगी चेअरमन सर्जेराव माने ,संचालक दिलीप पाटील, सिद्धू नरबळ, श्री बिरदेव तांनगे , पत्रकार विनोद शिंगे आदीसह शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
ऊस विकास अभियान अंतर्गत शेत शिवारामध्ये प्रबोधन करतांना माजी आम.अमल महाडिक चेअरमन सर्जेराव माने व शेतकरी वर्ग.
No comments:
Post a Comment