कसबा बावडा प्रतिनिधी -
कोल्हापूर महानगरपालिका शिक्षण समितीकडील,म न पा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र ११ , कसबा बावडा, कोल्हापूर चे केंद्रमुखाद्यापक डॉ.अजितकुमार भिमराव पाटील यांना राजस्थान मधील श्री. जगदीशप्रसाद झाबरमल तिबडेवाला विश्वविद्यापिठाची मराठी विषयातून त्यांना ही पदवी मिळाली.
" एकविसाव्या शतकातील मराठी विज्ञान साहित्याचे स्वरूप व सामाजिक विकासातील योगदान " या विषयावर हा प्रबंध सादर केला होता.त्यांना कोल्हापूर शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी एस के यादव, डॉ प्रतिभा घाग, डॉ कुलदीप शर्मा, डॉ माधव भोसले, डॉ मधु गुप्ता,डॉ आनंद पाटील, डॉ अजित कुशवाह, डॉ जे व्ही पाथरवट, डॉ बी बी पाटील, डॉ रवींद्र आचार्य, डॉ जोतिराम पाटील इत्यादींचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
विशेष म्हणजे डॉ. अजितकुमार पाटील यांचे प्राथमिक शिक्षण महानगरपालिकेच्या राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र ११ मध्ये झाले.त्यांची त्याच शाळेत केंद्रमुखाद्यापक म्हणून 2017 पासून ते या पदावर आहेत.
No comments:
Post a Comment