_*_कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती ,कसबा बावडा येथील राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र ११ मध्ये सावित्रीबाई फुले यांची १८९ वी जयंती उत्साहात संपन्न झाली. शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांच्या व शाळेच्या सेविका मंगल मोरे यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आजचा दिवस ' बालिका दिन ' म्हणून साजरा केला जातो. तसेच महिला शिक्षक दिन म्हणूनही साजरा केला जातो. यावेळी मंगल मोरे यांचा व नंदिनी कांबळे यांचा आदर्श परिपाठ चे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेचे केंद्र मुखाद्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी एकविसाव्या शतकातील महिलांनी सक्षम व अभ्यासू असणे गरजेचे आहे.आपल्या कुटुंबातील शिक्षणाचा व संस्कृती,संस्कार यांचे विचार समाजातील व्यावहारिक जीवन जगत असतांना उपयोग करावा.कोरोनाकाळींन आपत्तीमुळे घराचे आर्थिक व्यवस्था कोलमडून पडत आहे.त्यावर उपाय म्हणून आपल्या अंगी जे कौशल्य असेल त्याचा वापर करून उधोजक बनले पाहिले.सावित्रीबाई फुलेंनी तेंव्हाच्या काळात अतोनात हाल सोसले आहेत. आज एकविसाव्या शतकात आपण वावरत आहोत त्यामुळे समाज व घर यांचे मधील आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नाते जपणे गरजेचे आहे.यांचा विचार करून सक्षमपणे महिलांनी उभे राहणे ही आजच्या काळाची गरज आहे.
याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आदर्श परिपाठ चे पुस्तके भेट देण्यात आली.यावेळी सोशल डिस्टनस चे नियम पाळून कार्यक्रम शिस्तबद्ध करण्यात आला.
आभार ऋतुराज कोरवी यांनी मानले.
No comments:
Post a Comment