हातकणंगले/ प्रतिनिधी
दि.27/1/21
मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आनंदवन कराटे ग्रुपने एकवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.
आनंदवन कराटे ग्रुपच्या वतीने प्रत्येक वर्षी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते. सलग २१ वर्षे अखंड हा उपक्रम सुरू आहे. या शिबीरामध्ये पस्तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. सीपीआर च्या ब्लड बँकेच्या पथकाचे सहकार्य लाभले.ब्लड बँकेचे डॉ.शाजिदा ,वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली आवाडे , सुवर्णसिंग चव्हाण , शर्मिला लाड , सुनिता कर्णिक.श्रीविजय कडव, अशोक वाघमोडे, रोहित लोखंडे, पूजा चौगुले,रोहित भोरे.शंकर कांबळे, देवेंद्र कामत आदींचे सहकार्य लाभले.
संस्थापक अध्यक्ष राजकुमार थोरवत अध्यक्ष संदीप थोरवत, उपाध्यक्ष बबन चौगुले ,संदीप कांबरे,विजय पाटील संदीप मगदूम, सुनील थोरवत, निखिल शिंदे, अमर थोरवत, संतोष माळी, श्रीधर सावंत, धनाजी चौगुले, संतोष शेंडगे, सचिन थोरवत, सोमनाथ मगदूम,क्षीतीज पाटील आदींनी संयोजन केले होते.
No comments:
Post a Comment