पेठवडगाव / प्रतिनिधी
दि.१८/१/२१
कोल्हापूर जिल्ह्यातील आभाळमाया या सामाजिक संस्थेकडून नेहमीच समाजातील गरजू असाह्य अनाथ मुलांना वृद्धाश्रमवासी वृद्धांना मदतीचा हात दिला जातो ऊसतोड कामगारांच्या मुलांना कडाक्याच्या थंडीत माळावरच्या झोपड्यांमध्ये कुडकुडत रात्र काढावी लागते त्यांना चांगले शिक्षण अन्नधान्य आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत ही बाब लक्षात घेऊन. करवीर तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यातून आलेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांना आभाळमाया संस्थेकडून शिक्षणाधिकारी आशा उबाळे उपशिक्षणाधिकारी जयश्री जाधव शिक्षण विस्तार अधिकारी भारती कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊसतोड मजुरांच्या मुलांना स्वेटर, ब्लॅंकेट, शैक्षणिक खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले.
आभाळ माया संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पाटील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजभान जपत आदर्शवत कार्य करीत आहेत असे गौरवोद्गार प्राथमिक शिक्षण अधिकारी आशा उबाळे यांनी व्यक्त केले. समाजातील दानशूर व्यक्तींनी अशा ऊसतोड मजुरांच्या मुलांना मदत करण्याची गरज असल्याचे संस्थापिका लक्ष्मी पाटील यांनी सांगितले.
यावेळी आभाळमाया संस्थेचे पदाधिकारी बेबीनंदा मधाळे, रेखा पाटील, तुषार पाटील, माधवी पाटील, शांता वाकुडे, सविता पोतदार, राजू पाटील, शिवाजी बोंगार्डे ,प्रकाश चौगुले शरीफा मनेर, वर्षा सनगर, आकांक्षा मोकाशी, अश्विनी संकपाळ, बाळासो कांबळे, मिलिंद कांबळे हे उपस्थित होते. नांदगाव शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल मार्गदर्शिका वर्षा सनगर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तुषार पाटील यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.
फोटो
आभाळमाया संस्थेकडून ऊसतोड मजूरांच्या मुलांना वस्तू वाटप करतांना प्राथमिक शिक्षण अधिकारी आशा उबाळे अध्यक्षा लक्ष्मी पाटील व इतर मान्यवर
No comments:
Post a Comment