हातकणंगले/ प्रतिनिधी
दि.18/2/21
हेरले ( ता. हातकणंगले ) येथे कर्मवीर मल्टिस्टेट संस्थेच्या विस्तारित कक्षाचा शुभारंभ संपन्न झाला.
जयसिंगपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी, शाखा रुकडी अंतर्गत विस्तारित कक्षाचा हेरले येथे शुभारंभ संस्थेचे चेअरमन अनिल भोकरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी चेअरमन अनिल भोकरे यांनी घरबांधणी, नविन वाहन खरेदी, सोनेतारण कर्जासाठी दहा टक्के व्याजदराने तसेच सुवर्ण आभूषण खरेदीसाठी नऊ टक्के व्याज दाराने संस्थेने कर्ज योजना आणली असून हेरले गावातील सभासद व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक आदिनाथ किणींगे यांनी संस्थेकडे ४७० कोटी ठेवी व तीनशे कोटीची कर्जे असून शाखा नसतानाही हेरले गावातील सभासदांनी संस्थेकडे मोठ्या प्रमाणात व्यवहार केले आहेत याबद्दल त्यांचे आभार मानले. तर जेष्ठ संचालक भूपाल गिरमल यांनी संस्थेच्या विकासाचा आढावा घेऊन गावातील सभासद व ग्राहकांसाठी संस्थेच्या शाखांमधून दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा या विस्तारित कक्षाच्या माध्यमातून मिळतील असे सांगितले.
उदघाटन कार्यक्रमास जवाहर साखर कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील, मुनिर जमादार, उपसरपंच राहुल शेटे यांनी मनोगत व्यक्त करुन संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थेचे सल्लागार सदस्य अमोल पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर व्हा. चेअरमन रावसो पाटील यांनी आभार मानले. यावेळी शेतकरी सेवा संस्थेचे चेअरमन देवगोंडा पाटील ,ए.बी.चौगुले, प्रा.राजगोंडा पाटील संस्थेचे संचालक भरत गाट, सुकुमार पाटील, वि.दा.आवटी, रमेश पाटील, कुमार पाटील, राजेंद्र नांदणे, रावसो मलिकवाडे सल्लागार पी.ए.पाटील यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी,वीर सेवा दल सदस्य, सभासद, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो
हेरले : कर्मवीर मल्टिस्टेट संस्थेच्या विस्तारित कक्षाचा शुभारंभ करतांना चेअरमन अनिल भोकरे व इतर मान्यवर.
No comments:
Post a Comment