पेठवडगांव / प्रतिनिधी
वडगाव विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये वडगाव विद्यालय व श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई युती सचेतना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनीसाठी प्रबोधनात्मक व्याख्यान संपन्न झाले.
श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या स्मरणार्थ वडगाव विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थिनीसाठी प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या प्रतिमा पूजनाने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन एस ए पाटील यांनी केले.
व्याख्यात्या जी. व्ही. मोहिते यांनी युवती सचेतना फाउंडेशनच्या उद्दिष्टावर प्रकाश टाकून आईसाहेबांच्या जीवन कार्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून महिला सबलीकरण या विषयावर व्याख्यान दिले. याप्रसंगी मुख्याध्यापक आर. आर. पाटील , उपमुख्याध्यापक एस. डी.माने, डी. एस. कुंभार आदी मान्यवरांसह सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.
फोटो
वडगांव : श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई यांच्या स्मृतिदिनी विद्यार्थिनीसाठी प्रबोधन व्याख्यान कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर आर पाटील उपमुख्याध्यापक एस डी माने शेजारी शिक्षिका.
No comments:
Post a Comment