Monday, 1 March 2021

शिक्षण क्षेत्रात महिला शिक्षिकांचे योगदान कौतुकास्पद - नूतन सभापती मीनाक्षी पाटील



कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.1/3/21
  शैक्षणिक समस्यांचे सोडवणूक करण्यासाठी कटिबद्ध आहोत. असे प्रतिपादन करवीर नूतन सभापती मीनाक्षी पाटील यांनी केले. शिक्षक संघ महिला आघाडी मार्फत नूतन सभापती  मीनाक्षी पाटील यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.
   महिला शिक्षिका घरातील सर्व जबाबदारी सक्षमपणे पेलत शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी सर्वांगीण विकासाकरिता देत असलेले योगदान कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्गार महिला सभापती यांनी व्यक्त केले.शिक्षक संघाच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक बँकेच्या संचालिका  लक्ष्मी पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या सभापती  यांच्या समोर मांडल्या.करवीर तालुक्यातील सर्व शैक्षणिक  प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू तसेच पालकमंत्री सतेज पाटील , शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर  यांच्या कुशल नेतृत्वात शिक्षण क्षेत्रातील समस्यांची सोडवणूक करण्याकरता प्राधान्याने काम करू अशी  सभापती यांनी ग्वाही दिली.यावेळी छाया पानारी , निशा नातू, जयश्री पाटील , माधवी पाटील,  सुनिता सुतार , शैलजा गरडकर,  शुभांगी सुतार यांनी शैक्षणिक समस्या बाबत चर्चेत सहभाग घेतला. सर्वांच्या हस्ते नूतन सभापती  मीनाक्षी पाटील व  त्यांना साथ देणारे सामाजिक कार्यकर्ते  भगवान पाटील  यांचा सत्कार  बाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
     फोटो 
 शिक्षक संघ महिला आघाडी कडून पंचायत समिती करवीर नूतन सभापती मीनाक्षी पाटील यांचे अभिनंदन करताना जिल्हाध्यक्षा लक्ष्मी पाटील जयश्री पाटील माधवी पाटील निशा नातू व महिला पदाधिकारी.

No comments:

Post a Comment