Tuesday, 2 March 2021

कोल्हापूरच्या सुमित मोगलेंनी केली सामाजिक बांधिलकीतून ज्योतिबा डोंगरावर साफ-सफाई.




पेठवडगांव/ प्रतिनिधी
दि.2/3/21
 कोल्हापूरचे प्रसिद्ध देवस्थान  ज्योतिबा डोंगरावर कोल्हापूरचे सुमित मोगले यांनी ५० ते ६० लोकांना एकत्रित करून ज्योतिबा डोंगराची साफसफाई मोहीम पूर्ण केली.
    कोल्हापूरचे प्रसिद्ध देवस्थान म्हणजे ज्योतिबा या डोंगरावर अनेक भाविक गर्दी करत असे परंतु या ठिकाणी अनेक भाविक येऊन कचरा व प्लास्टिक तसेच टाकून जातात व हलगर्जीपणा करतात.
 सुमित मोगले यांनी नुकतेच या जागेला भेट दिली होती तर त्याच्या निदर्शनास आले की या ठिकाणी कचरा आणि प्लास्टिक चे प्रमाण वाढले होते त्यांनी त्या ठिकाणीचा एक व्हिडिओ तयार करून  ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी त्यांची साथ देऊन ज्योतिबा डोंगर साफ करण्यास मदत करावी असे आवाहन केले.
      अनेक लोक मिळाले आणि ही मोहीम त्यांनी सोमवारी पूर्ण केली या मोहिमेच नाव त्यांनी 'क्लीन कोल्हापूर' असे ठेवल आहे या मोहिमेत तब्बल  ६० जण एकत्र आले होते. यात लहान वयाची मुल ते वयस्कर लोक ही जमले होती.या उपक्रमामध्ये कोणी राजकारणी, ट्रस्ट , फाऊंडेशनची मदत न घेता त्यांनी ही सफाई केली,यात प्लास्टिक, प्लास्टिकच्या बाटल्या, पत्रावळ्या, लहान मुलांचे डायपर्स, कपड्यात बांधलेले नारळ इत्यादी साहित्य या ठिकाणी निदर्शनास आले या वस्तू एकत्रित करून त्याची विल्हेवाट लावली.या मोहिमेत देवस्थान च्या पुजारांनी देखील सहभाग घेतला  आणि हि मोहीम यशस्वीरित्या पार पाडली.
यानंतर त्यांनी ठिकठिकाणी संदेश देणारे कॉमेडी पोस्टर्स लावले जेणेकरून लोकांचे लक्ष जाईल आणि ते परिसर साफ ठेवतील.
     जे सुमित मोगलेंनी केले ते तुम्ही आम्ही करू शकतो. सर्व तरुण पिढीने एकत्र येऊन आपला आजूबाजूचा परिसर, सार्वजनिक ठिकाणी, व इतर पर्यटन ठिकाणी जाऊन साफसफाई करून आपला परिसर, तालुका, जिल्हा स्वच्छ करूया.

       फोटो 
जोतिबा डोंगरावर सुमित मोगलेंच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकीतून साफ सफाई करून क्लीन कोल्हापूर मोहिम यशस्वी करणारे युवक युवती व मुले.


1 comment: