Monday, 22 March 2021

सुप्रसिद्ध कवी व शाहीर प्राध्यापक कुंतीनाथ करके पाटील यांचे निधन

कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.22/3/21

      सुप्रसिद्ध कवी व शाहीर प्राध्यापक कुंतीनाथ करके पाटील यांचे  ( वय ८५ ) निधन झाले. 

त्यांच्या  जीवन कार्याचा अल्पपरिचय

    हेरले (ता. हातकणंगले ) येथे10 एप्रिल 1936 साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण बी.ए.पुणे विद्यापीठ ( 1959 ) साली झाले तर बी. एड. श्री मौनी विद्यापीठ गारगोटी येथे ( 1961) झाले.
        डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत सन 1959 ते 1994 पर्यंत मुख्याध्यापक ते प्राचार्यपदाची सेवा सातवे, तुळजापूर, कराड ,कोल्हापूर पारगाव, इचलकरंजी, अजीवली, कापशी, मसूद माले, वडणगे, निगवे आदी ठिकाणी  बजावून 35 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर  ते  दिनांक 1 मे 1994 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी  केलेल्या उतुंग कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

          पुरस्कार
कर्नाटक राज्यात निडसोशी येथे १९९० ला सर्वज्ञ गौरव पुरस्कार.नेताजी सुभाषचंद्र बोस पुरस्कार. स्वातंत्र्य शाहीर शंकरराव निकम, कुंडल पुरस्कार
दि. १५/८/२०००, डॉ. भाऊराव पाटील कर्मवीर पुरस्कार ८ जून१९९७ ला औरंगाबाद येथे दिला. १४ एप्रिल २००३ रोजी महाराष्ट्र शासनाने “दलित मित्र पुरस्कार” प्रदान केला,कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार दिनांक पाच सप्टेंबर 1984 प्रदान करण्यात आला.2011- 12 सालामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने सांस्कृतिक विभागामार्फत बेस्ट शाहीर म्हणून पुरस्काराने सन्मानित केले.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने  17 फेब्रुवारी 2021 रोजी डी.लीट पदवी बहाल केली.

      साहित्यिक कार्य

काव्य संग्रह - पाझर, चैत्र पालवी, कांचन कुंभ,जलधारा. शाहिरी कविता- रणझुंजार, शाहिरी झंकार, रंगदार लावण्या,नवाशाहीर.
नाटक - खुळं पेरलं येड उगवलं
आत्मकथन- ताज्या आठवणी
• चरित्र - कथा ही महावीराची
चित्रपट गीते - रंगू बाजारला जाते, औंदा लगीन करायचं, बोला दाजीबा, सख्या सजना, बायको आली बदलून,अन्याय, प्रतिकार, सुळावरची पोळी, सोंगाड्या तील बिब्बं घ्या इत्यादी गीते लिहिली.

        कॅसेटस
लोक संगीत बाळू मामा (मंजूळ गाणी)
 जोतिबाच्या नावानं चांगभलं, पालखी ज्योतिबाची,मायेची मायाक्का, चंदनाच्या पालखीत, संगे गजानन (शेगाव), शंकराच्या सुता, डॉ. कर्मवीर भाऊराव,
शिवशंभो, महालक्ष्मी स्तोत्र, तुळजाभवानी, जैन भजन, माझे तुळजाई बाहुबली ते बाहुबली इत्यादी.

       
सामाजिक कार्य

शाहिरी पोवाड्याचे कार्यक्रम करुन गरीब
विद्यार्थ्यांना कपडे, धान्य, रोख रक्कम दिली.दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत, स्कूल ऑफ ओरिएंटल अॅण्ड आफ्रिकन स्टडीज युनिव्हर्सिटीऑफ लंडन विद्यापीठाने माझ्या आवाजात
स्वलिखीत पोवाडे लोकगीते १९६४ साली
ध्वनिमुद्रीत करुन नेली.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या बी. कॉम. भाग-१
च्या मायबोली, साहित्य सहवास या पाठ्यपुस्तकात कविता निवडल्या.
 साहित्य सौरभ कार्यक्रमात सांगली आकाशवाणी वरून कविता वाचली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन इचलकरंजी,कसबा बावडा येथे कविता वाचन.आटपाडी, विटा, पलूस, इस्लामपूर, पुणे येथे कवि
संमेलनाचे अध्यक्ष अखिल भारतीय मराठी जैन साहित्य परिषदेच्या १२
व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री क्षेत्र
बाहुबली कुंभोज जि. कोल्हापूर येथे १९९९ साली. अनेक शाळा कॉलेजमधून स्नेह-संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शनपर भाषणे दिली.
 काँग्रेस पक्षाचा प्रभावी प्रचार २० वर्षे केला.दि.१५/११/१९७९ रोजी, कै. इंदिरा गांधींचे कुडाळ ते गांधीमैदान, कोल्हापूर येथे आगमन होईपर्यंत,लाखो लोकांना प्रतिभेने ५ तास हसवत रोखून धरले.
राजर्षि शाहू महोत्सवात कोल्हापूरात शाहिरी कला सादर करुन लोकप्रियता मिळवली. भगवान महावीर
निर्वाण महोत्सव २५०० वा निमित्त शाहिरी कार्यक्रमाचा दौरा केला.
मुंबई आकाशवाणीवरुन प्रथमत:च जैन भजन सादर करणारा पहिला शाहीर दि. ०१ मे १९९४ ला सेवा निवृत्त झाले.
सध्या लेखन, व्याख्याने व शेती सांभाळून उत्तम जीवन जगत होते.
दि. २७ सप्टेबर २००९ आळंद, जि. गुलबर्गा येथे आम. सुभाष गुत्तेदार यांच्या शुभहस्ते जाहीर सत्कार संपन्न झाला.
दि. २८ ऑक्टोबर २००९ मराठवाडा विद्यापीठ, युवक महोत्सव, बक्षिस वितरण समारंभाचे प्रमुख पाहूणे. संयोजक प्राचार्य रमेश दाबके, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, उस्मानाबाद.
दि. ३१ ऑक्टोबर २००९ अनंत विद्यानगर संकेश्वर येथे मा. नाम. मल्हार गौडा पाटील, आयोजित इंदिरा
गांधी स्मृति दिन, प्रमुख पाहूणे उपस्थिती व मार्गदर्शन व सत्कार.दि. ३० एप्रिल २०१० रोजी महाराष्ट्र शासना मार्फत
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त श्री शाहू खासबाग मैदान, कोल्हापूर येथे मा. ना. हर्षवर्धन पाटील पालकमंत्र्यांचे अमृतहस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.

       सांस्कृतिक कार्य

१९६४ ते ८७ आकाशवाणी पुणे, मुंबई, सांगली केंद्राचे गायक, शिवकालीन, पेशवाई आणि इंग्रजकालीन शूरवीरांचे
पोवाडे रचून आकाशवाणीवरुन सादर केले.शिवजयंती, हनुमान जयंती, बसवेश्वर जयंती, गणेशोत्सव,
भगवान महावीर जयंती निमीत्त श्री क्षेत्र तूळजापूर, टिळक चौक, सोलापूर, सांगोला, मंगळवेढा, पळसदेव, ता.इंदापूर
(पुणे), आळंद (गुलबर्गा) संकेश्वर, रत्नागिरी, निपाणी, हुपरी,कोल्हापूर, सांगली, बीड, नांदेड, परभणी, बार्शी, बारामती,जेजुरी, भिवंडी, कन्नमवारनगर, मुंबई, शिवाजी पार्क, आमदार
निवास मुंबई, शनिवारवाडा, पुणे, पिंपरी चिंचवड, पेण,रायगड, सावरकरांचा पुर्णाकृती पुतळा, उद्घाटनानिमित्त
रत्नागिरी, आंबेजोगाई येथे शाहिरीसत्र संचालक १० दिवस,नवरात्रौत्सव - तुळजापूर व कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर येथे पोवाड्यांचे जाहीर कार्यक्रम करुन समाज प्रबोधन व परिवर्तनाचे भरीव कार्य केले.
       
     दूरदर्शन गायक

 दि. ५ मार्च १९७६ व १६ ऑगस्ट१९८७ असे २ वेळा वरळी मुंबई दुरदर्शन लोकसंगीत सादर केले होते.
अशा बहु आयामी व्यक्तिमत्वाचे वयाच्या ८५ वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,सून ,दोन मुली जावाई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

No comments:

Post a Comment