हेरले / वार्ताहर
दि.30/4/21
हेरले (ता. हातकणंगले) येथे कोरोना संसर्ग फैलाव रोखण्यासाठी सोमवार दि. ३ मे ते शुक्रवार दि. ७ मे पर्यंत पाच दिवसाचा कडक लॉकडाऊनचा निर्णय ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.विक्रेते व्यापारी दुकानदार व्यावसायिक भाजीपाला विक्रेते फळ विक्रेते तसेच संशयित रुग्ण यांची अँटीजन टेस्ट करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे एक हजार अँटीजन टेस्ट किटच्या मागणीसह दररोज २५० कोरोना प्रतिबंध लसीची मागणीही केली आहे.
ब्रेक द चेन या मोहिमे अंतर्गत कोरोना संसर्ग फैलाव रोखण्यासाठी गावातील फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते , दुकानदार, व्यवसायिक, व्यापारी यांचा नागरीकांशी वस्तूच्या देवघेवीमुळे संसर्ग होण्याचा संभंव असल्याने त्यांची अंटीजेन टेस्ट करून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपयोजना करण्याचे ग्रामपंचायतीने मोहिम निश्चित केली आहे. तसेच खाजगी दवाखान्यातील उपचार घेणारे आजारी संशयित रुग्ण यांचीही खाजगी डॉक्टरांच्या मार्फत माहिती घेऊन त्यांची ही अँटीजेन टेस्ट करण्याचे नियोजन केले आहे. जेणेकरून गावांमधील वरील घटकांच्या टेस्ट झाल्यामुळे कोरोना संसर्ग फैलाव वेळेत रोखता येईल.
ग्रामपंचायतीच्या वतीने या अँटीजेन टेस्ट लॅब टेक्नीशियनच्या सहकार्याने होणार आहेत. त्यांना या कार्यासाठी मानधन ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे संशयित रुग्णांची तात्काळ चाचणी होईल आणि जे पॉझिटिव्ह येणार आहेत त्यांच्यावर योग्य उपचार केले जातील. या मोहिमेची सुरूवात शनिवार पासून होत आहे.तसेच ग्रामपंचायतीच्यावतीने सर्व खाजगी दवाखाने, सर्व औषधे दुकाने व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दररोज सकाळी व संध्याकाळी सॅनिटायजरची फवारणी पुढील पंधरा दिवस केली जाणार आहे. या उपाययोजनामुळे कोरणा संसर्ग फैलाव रोखता येईल. त्यामुळे गावांमधील कोरोना रुग्ण संख्या कमी होऊन गाव पूर्णपणे कोरोना मुक्त होईल.
या उपयोजनेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे पत्रव्यवहार करून एक हजार अँटीजन टेस्ट किटच्या मागणीसह दररोज २५० कोरोना प्रतिबंध लसीची मागणीही केली आहे. हेरले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल देशमुख या मोहिमेत सहकार्य करीत आहेत. या बैठकीस सरपंचअश्विनी चौगुले,उपसरपंच सतीश काशीद माजी उपसरपंच विजय भोसले ,राहुल शेटे,सदस्य मज्जीद लोखंडे,आदिक इनामदार,शरद आलमान,बटुवेल कदम,दादासो कोळेकर सदस्या अपर्णा भोसले,विजया घेवारी, स्वरूपा पाटील,आरती कुरणे,शोभा खोत, ग्रामसेवक संतोष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती प्रसिध्दीस माजी उपसरपंच राहूल शेटे यांनी दिली.
No comments:
Post a Comment