हातकणंगले / प्रतिनिधी
दि.15/5/21
हेरले ( ता. हातकणंगले ) येथे सामाजिक बांधिलकीतून अमित पाटील गावातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपल्या मित्रांच्या सहकार्याने सहा प्रभागातील परिसरामध्ये सोडियम हायपो क्लोराईडची फवारणी करीत गावातील परिसर निर्जंतुकीकरण करीत आहेत.
हेरले गावामध्ये कोरोना संसर्ग वाढून रुग्णांची संख्या वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी व आटोक्यात आणण्यासाठी युवा नेते अमित पाटील यांनी स्वतःच्या आर्थिक मदतीसह सहकारी मित्रांच्या वर्गणीतून गावातील सहा प्रभागातील घरांच्या अंगणात व परिसरात सोडियम हायपो क्लोराईडची फवारणी करून गावातील परिसर निर्जंतुकीकरण करीत सामाजिक बांधिलकी जपत आहेत. त्यांना बखतीयार जमादार,विशाल परमाज,संदीप कोले , बतुवेल कदम,तेजस कटकोळे, उमेश पाटील, आशपाक देसाई आदी मित्रांचे सहकार्य लाभत आहे.
फोटो
हेरले : येथे सोडियम हायपो क्लोराईडची फवारणी करतांना अमित पाटील बतुवेल कदम विशाल परमाज व अन्य मान्यवर.
No comments:
Post a Comment