Friday, 11 June 2021

माध्यमिक शिक्षकांच्या कोविड ड्युटी रद्द करण्याची मुख्याध्यापकसंघाची मागणी - सुरेश संकपाळ


कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.12/6/21

माध्यमिक शाळांच्यामध्ये इ.१० वी निकालाच्या संदर्भाने मूल्यमापनाची कार्यवाही सुरु असून यासाठी माध्यमिक शिक्षकांची शाळेमध्ये उपस्थिती गरजेची आहे. इ. १० वी निकालाचे काम विहित मुदतीत करावयाचे असल्याने शिक्षकांना कोवीड ड्युटीतून मुक्त करण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक
संघाच्या सभेत करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ होते.
     या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवदने देण्यात आले.महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे मार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ( इ.१०वी ) साठी मूल्यमापन कार्यपध्दतीचा तपशील जाहीर केला आहे यानुसार विषय शिक्षकांनी विषयनिहाय गुणतक्त्ते वर्गशिक्षकांकडे सादर करणे
तसेच वर्गशिक्षकांनी संकलित निकाल अंतिम करून शाळा समितीकडे सादर करणे. शाळा समितीने निकालाचे परिक्षण करून प्रमाणित करणे, मुख्याध्यापकांनी विषयनिहाय गुण संगणकीय प्रणालीमध्ये भरणे. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे निकाल व इतर प्रपत्रे विभागीय मंडळात जमा करणे ही कार्यवाही दि.११/०६/२०२१ ते दि ३०/०६/२०२१ या कालावधीत पूर्ण करावयाची असल्याने माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या कोविड ड्युट्या रद्द करून शैक्षणिक कामकाजासाठी कार्यमुक्त करण्यात यावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ
यांनी केले.
   यावेळी संघाचे उपाध्यक्ष बी. आर. बुगडे, मिलिंद पांगिरेकर, सचिव दत्ता पाटील,सहसचिव अजित रणदिवे, टेझरर नंदकुमार गाडेकर, लोकल ऑडिटर आय. ए. अन्सारी,संपर्क प्रमुख अशोक हुबळे, संचालक पी.जी.पोवार, रविंद्र मोरे, श्रीशैल्य मठपती, सागर कुमार चुडाप्पा, जितेंद्र म्हैशाळे, संजय भांदुगरे, सखाराम चौकेकर, संजय देवेकर, श्रीकांत पाटील,गुलाब मारुती पाटील, सुरेश उगारे, एस.एस.चव्हाण, एस. आर. पाटील, जनार्दन दिडे संचालिका अनिता नवाळे, सारिका यादव स्वीकृत सदस्य बी.सी. वस्त्रद सेवानिवृत्त सदस्य जीवनराव साळोखे, शिवाजी नाना माळकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment