हेरले / प्रतिनिधी
दि.2/6/21
हेरलेमध्ये संस्थात्मक अलगीकरण केंद्र स्थापन झाले असून या अलगीकरण केंद्राच्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून गाव शंभर टक्के कोरोनामुक्त होण्यासाठी मदत होणार आहे.यासाठी गावातील सर्व घटकांचे सहकार्य लाभले आहे. हा उपक्रम स्तूत्य आहे. असे मत माजी सभापती राजेश पाटील यांनी व्यक्त केले.
ते हेरले ( ता. हातकणंगले ) येथे जिल्हा परिषद सदस्य,ग्रामपंचायत ,प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडिकल असोसिएशन, एमआर असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने लक्षणे नसलेली मात्र कोरोना अहवाल सकारात्मक आलेल्या रुग्णांसाठी नॉन ऑक्सिजन ३० बेडचे संस्थात्मक विलगीकरणाचे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या प्रसंगी बोलत होते. या केंद्राचे उद्घाटन पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार यांच्या हस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी हातकणंगले पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. एन.पाटील म्हणाले, गावांमध्ये नॉन ऑक्सिजन ३० बेडचे संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरू झाले आहे खरोखरच गावाचे हे कार्य गौरवास्पद असून या आरोग्य सेवेस पोलिस प्रशासनाकडून सदैव सहकार्य राहिल.
या वेळी या संस्थात्मक विलगीकरणाची माहिती देताना वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख म्हणाले, नॉन ऑक्सिजन ३० बेडच्या संस्थात्मक विलगीकरणात १५ पुरूषांसाठी व १५ स्त्रियांसाठी बेडची सोय केली आहे. या रुग्णांच्या सेवेसाठी एक वैद्यकिय अधिकारी,दोन सहाय्यक खासगी डॉक्टर ,तीन वॉर्ड बॉय,एक टेक्निशियन,एक डाटा एंट्री ऑपरेटर,एक फार्मासिस्ट,तीन नर्स, एक चालकसह रुग्णवाहिका या सेंटरच्या आरोग्य सेवेसाठी कार्यरत आहे. रुग्णांना मोफत औषध पुरवठा ग्रामपंचायतीने पंधरा वित्त आयोगातून केला आहे .अशी माहिती दिली.
या प्रसंगी पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, पोलिस पाटील नयन पाटील , उपसरपंच सतिश काशिद ,माजी उपसरपंच संदिप चौगुले, विजय भोसले, राहूल शेटे,मुनिर जमादार,डॉ.आर. डी.पाटील, डॉ महावीर पाटील, डॉ अमोल चौगुले, डॉ. इमरान देसाई,डॉ शरद आलमान, डॉ. सुरेखा आलमान,कोतवाल मंहमद जमादार आदी मान्यवरांसह ग्रामपंचायत सदस्य व अन्य सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
हेरले: येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्राचे उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार शेजारी माजी सभापती राजेश पाटील ,पोलिस पाटील नयन पाटील, डॉ.राहूल देशमुख व अन्य मान्यवर.
No comments:
Post a Comment