Monday, 21 June 2021

हेरले कोविड केअर सेंटर ला मा. आमदार सुजित मिणचेकर यांची भेट

हातकणंगले / प्रतिनिधी
दि.22/6/21

हेरले ( ता. हातकणंगले ) येथील ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्ग्य केंद्र, मेडिकल असोसिएशन, एमआर असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेले मोफत उपचार केंद्र व विलगिकरण केंद्रास माजी आमदार  डॉ. सुजित मिणचेकर यांनी भेट देऊन या मोफत आरोग्य सेवेचे कौतुक केले.

    माजी आम.डॉ.सुजित मिणचेकर  म्हणाले, या गावासाठी आपण ही काही देणे लागतो. या हेतूने गावातील डॉक्टर सामाजिक बांधिलकीतून कोविड केअर सेंटरला  मोफत सेवा देत आहेत. त्यांचे सेवाभावी कार्य कौतुकास पात्र आहे. तसेच गावातील कोरोना परस्थिती हाताळत असताना माजी सभापती, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच ,उपसरपंच, पोलीस पाटील,  ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी,  मेडिकल व एमआर असोसिएशन, आशा स्वयंमसेविका,अंगणवाडी सेविका या सर्वांनी गावासाठी दिलेले योगदान व केलेल्या उपाययोजनामुळे कोरोनाची परिस्थिती आज नियंत्रणात आली आहे. आपण केलेले योगदान जनता कधी ही विसरणार नाही असे मत व्यक्त केले. या प्रसंगी कोरोना आजाराने बरे झालेल्या रुग्णांना डीस्चार्जचे पत्र देण्यात आले.
   यावेळी माजी साभापती राजेश पाटील, पोलिस पाटील नयन पाटील, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, सरपंच प्रतिनिधी संदिप चौगुले,उपसरपंच सतीश काशिद, माजी उपसरपंच विजय भोसले ,माजी उपसरपंच राहुल शेटे, ग्रामपंचायत सदस्य रणजित इनमादर, संदीप मिरजे, तुषार अलमान, मंदार गडकरी, इब्राहीम खतीब, डॉ. अमोल चौगुले, डॉ. आर डी पाटील, डॉ. महावीर पाटील, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. 

     फोटो 
हेरले : येथील मोफत विलगिकरण केंद्राची पाहणी करून  रूग्णांना डिस्चार्जचे पत्र देतांना माजी आम.डॉ. सुजित मिणचेकर माजी सभापती राजेश पाटील पोलिस पाटील नयन पाटील व अन्य मान्यवर.

No comments:

Post a Comment