हेरले/ प्रतिनिधी
दि.26/6/21
रूकडी ( ता. हातकणंगले) येथील महात्मा गांधी विदयालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या सत्र प्रारंभीच विद्यालयातील एनसीसी छात्रांनी वेगवेगळ्या विभागात प्राविण्य प्राप्त केलेबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सुभेदार मारुती वडणगेकर होते. पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूर व निवृत्ती सत्कारमुर्ती म्हणून मेजर के.एम.भोसलेउपस्थितहोते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य जे.के.जाधव होते. याप्रसंगी स्वागत व प्रास्तविक एनसीसी ॲाफिसर एम.एस. हजारे यांनी केले. एनसीसी छात्रांनी कोविड काळात देखील वेळोवेळी केलेले ऑनलाईन उपक्रम व मार्गदर्शन खूपच उपयुक्त ठरल्याचे त्यांनी मनोगतात सांगितले.
प्रमुख सत्कारमुर्ती सेवानिवृत्ती मेजर भोसले यांनी आजच्या काळात विद्यार्थी कसा देशभक्त घडेल याविषयी अनेक उदाहरणे दिली.प्रमुख पाहुणे सुभेदार वडणगेकर यांनी आजच्या धावपळीच्या युगात विद्यार्थी घरी असला तरी गुगल नेटचा वापर करून कसा प्रगती साधू शकतो. याविषयी मनोगत व्यक्त केले.आभार स्वामी यांनी मानले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अध्यापिका दाभाडे यांनी केले.याप्रसंगी ग्रंथपाल एल बी पाटील व शिक्षक शिक्षकेत्तर स्टाफ व विद्यार्थी पालक उपस्थित होते.
फोटो
रूकडी: महात्मा गांधी विदयालयामध्ये एनसीसी छात्रांचा सत्कार करतांना सुभेदार मारूती वडणगेकर शेजारी अन्य मान्यवर.
No comments:
Post a Comment