वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन चे भव्य रक्तदान शिबिर
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडहिंग्लज व कोल्हापूर शिवाजी पेठ येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कोविड 19 चे सर्व शासकीय नियम व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत हे रक्तदान शिबीर घेण्यात आले..
पहिले आलेले तीन रक्तदाते यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ही संघटना कोणतीही जात धर्म न पाहता वैद्यकीयबाबतीत मदत करते. या संघटनेच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे झालेली आहेत व भविष्यात होत राहतील.
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष मराठा प्रविण, अवधूत सुर्यवंशी, दिनेश कदम, सचिन खेतले, शिरीष देवरे, दत्ता जगदाळे, देव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे काम सुरू आहे. सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. या जाणिवेतून महाराष्ट्रात 72 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 2 ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीराला प्रचंड मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्रात 5023 व कोल्हापूर जिल्ह्यात 205 ब्लड बॅग चे रक्तसंकलन झाले आहे
कोल्हापूर येथे श्री विकास जाधव, संताजी पाटील, जितू साबळे, रोहित लांबे - पाटील तसेच सर्व ॲडमिन व स्वयंसेवक यांनी संयोजन केले.
WMO Team Kolhapur Great Job ✌️🚩
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete5023 हे केवळ अंक नाहीत तर WMO परिवाराने संकटकाळात जपलेल्या सामाजिक बांधिलकीचे सर्वोत्तम उदाहरण आहे.Great job all team members and donors...
ReplyDelete