हातकणंगले / प्रतिनिधी
हेरले ( ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीचे नदीकडील गाव पाणी पुरवठयाची विदयुत वाहिनीचे डांब व डिपी अतिवृष्टीने महापूरामध्ये बुडाल्याने अकरा दिवस विजपुरवठा बंद पडला होता. महावितरणचे कनिष्ठ अभियांता संदिप कांबळे त्यांचे सहकारी व ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी मंगळवारी दिवसभर अथक प्रयत्नाने विजपुरवठा पूर्ववत सुरु केला.
महापूरामुळे नदीकडील भागातील गाव पाणी पुरवठ्याच्या विद्युत जोडणीसाठी असणारे उच्चदाब वाहिनीचे जवळपास दहा ते बारा खांब हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले होते. त्यापैकी दोन पोल पाण्याच्या जास्त दाबामुळे पूर्णपणे झूकून विद्युत वाहिनीच्या तारा खाली आल्या होत्या. तसेच बऱ्याच ठिकाणी पोलवर नदीच्या पाण्यातून वाहून आलेला कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला होता. पाणी पूर्णपणे ओसरले मात्र मोठ्या प्रमाणात चिखल आणि दलदल असल्यामुळे काम करण्यास अडचण येत होती. तरीही झुकलेले दोन पोल सरळ करून घेतले. खाली आलेल्या तारा पूर्णपणे व्यवस्थित करून घेऊन विद्युत लाईनवर अडकलेला कचरा काढून घेतल्याने लाईन चालू करण्यात यश आले.
यामध्ये महावितरणचे कर्मचारी जगन्नाथ शिंगे, संतोष जाधव तय्यब मुल्ला, वैभव पाटील, अश्रफ खतीब, वैभव अपराध, विनायक सुतार, युवराज चौगुले, प्रमोद चौगुले व ग्रामपंचायत कर्मचारी राहूल निंबाळकर ,महावीर दाबाडे ,मनोज लोखंडे, राजू सोळंखी, दिलीप जाधव आदी सहभागी होऊन कार्यरत होते.
फोटो
हेरले : नदीकडील गाव पाणी पुरवठा विद्युत वाहिनीवर महापूरामुळे अडकलेला कचरा काढतांना महावितरणचे कर्मचारी.
No comments:
Post a Comment