हेरले / प्रतिनिधी
दि.14/9/21
हेरले ( ता. हातकणंगले) येथील हेरले क्रीडा मंडळ हेरले यांच्या वतीने खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते गावातील सर्व डॉक्टर, हेरले मेडिकल असोसिएशनचे सर्व प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, आशा मदतनीस तसेच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांनी कोरोना संसर्ग काळात जनतेची अखंडीत आरोग्य सेवा केल्या बद्दल त्यांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार समारंभ संपन्न झाला.
खासदार धैर्यशील माने यांनी कोरोना संदर्भात घ्यावयाची काळजी तसेच कोणते नियम आपण पाळले पाहिजेत याबाबत आपल्या मनोगता मधून सर्वांचे प्रबोधन केले. सर्व नागरिकांना कोविड लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे व गावात शंभर टक्के लसीकरण पूर्ण होण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी असे आवाहन केले.सर्वांनी मास्क वापरावे वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत आदीसह कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक संदेश मनोगतातून व्यक्त केले.
प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज , राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणी देसाई यांनी केले. समाजसेविका निलोफर खतीब, डॉ.प्रविण चौगुले, अभिषेक मोहिते, वैद्यकिय अधिकारी डॉ.राहुल देशमुख ,डेव्हिड लोखंडे पर्यवेक्षिका एस.ए.कोळेकर, ग्रामपंचायत सदस्या निलोफर खतीब यांनी मनोगते व्यक्त केली.
या समारंभास हेरले क्रीडा मंडळाचे सर्व आजी माजी खेळाडू,मंडळाचे आधारस्तंभ, ग्रामस्थ व युवक उपस्थितीत होते.सूत्रसंचालन प्रा. विलास हराळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार अमर वड्ड यांनी मानले.
फोटो
हेरले : येथे क्रीडा मंडळाच्या सत्कार समारंभ सोहळयात बोलतांना खासदार धैर्यशील माने शेजारी अन्य मान्यवर.
No comments:
Post a Comment