Saturday, 16 October 2021

हेरलेत दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा



हेरले / प्रतिनिधी
दि.16/10/21
हेरले (ता. हातकणंगले ) येथे कोरोना  नियमावलीचे काटेकोर पालन करीत दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शमीचे पूजन माजी सभापती राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
   बुधवारी सायंकाळपासून गावातील सर्व ग्रामदेवता मंदिरामध्ये विधीवत देव - देवतांची पूजा आर्चा करून रात्र जागवण्याचा जागरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. गुरुवारी सकाळी ग्रामस्थांनी खंडीचे पूजन करून ग्रामदैवत हनुमान मंदिर, महादेव मंदिर, बिरोबा मंदिर, मरगुबाई मंदिर, गणेश मंदिर आदीसह अन्य मंदिरातील समईमध्ये तेल घालण्याचा कार्यक्रम संपन्न झाला
     शुक्रवारी सायंकाळी ग्रामस्थांनी आपली दुचाकी,तीनचाकी, चारचाकी वाहने सजवून माळभाग सीमोल्लंघन कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थिती लावली. या प्रसंगी गावातून बिरोबादेवाचा पालखी सोहळा सवाद्य सीम्मोलंघ्घन स्थळी आला. बिरोबादेवाची विधीवत पूजा आर्चा झालेनंतर माजी सभापती राजेश पाटील यांच्या हस्ते शमीचे पूजन करण्यात आले. तदनंतर ग्रामस्थांनी सीमोल्लंघन कार्यक्रम संपन्न केला. यावेळी सरपंच अश्विनी चौगुले, पोलिस पाटील नयन पाटील, माजी उपसरपंच संदीप चौगुले, उपसरपंच सतीश काशीद, माजी उपसरपंच विजय भोसले, राहुल शेटे, आदीसह ग्रामपंचायत सदस्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
     'सोने घ्या सोन्यासारखे रहा ' असे प्रत्येकास शुभेच्छा देत ग्रामस्थांनी सर्व ग्रामदैवतांना सोने वाहिले. गावांमध्ये सोशल डिस्टन्स पाळत, गर्दी होणार नाही याची काळ्जी घेत कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन होऊन मोठ्या आनंदात व उत्साहात दसरा सणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
      फोटो 
हेरले : येथे सीम्मोलंघ्घन उत्सव प्रसंगी माजी सभापती राजेश पाटील शमीपूजन करतांना.

No comments:

Post a Comment