*
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण संचालित राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळा क्र 11कसबा बावडा अंतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली या शिक्षण परिषदेमध्ये डायट चे प्राचार्य आय सी शेख, ज्येष्ठ अधिव्याख्याता विजयकुमार भिसे,केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील, तज्ञ मार्गदर्शक सारिका पाटील, दिपाली पाटील, उन्नती शिरगावकर व टी आर पाटील अनिल सरक ,विद्या पाटील, छाया हिरगुडे यांच्या सहकार्याने संपन्न झाले. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे साधन आहे व शिक्षणाशिवाय समाज परिवर्तन अशक्य आहे असे मत डायट चे प्राचार्य आय सी शेख यांनी मनोगतामध्ये व्यक्त केले तसेच ज्येष्ठ अधिव्याख्याते विजयकुमार भिसे यांनी स्वाध्याय उपक्रम, दिशा प्रश्नपेढी ,शाळा सिद्धि या विषयावर तुलनात्मक अभ्यासाची गुणवत्ता कशी असते हे उदाहरण सांगितले नास परीक्षा ही स्वाध्याय उपक्रमावर आधारित असून त्याचे महत्त्व पालकांना समजावून सांगा असे आवाहन केले .दिपाली पाटील यांनी शाळा सिद्धि चे क्षेत्र व मानके यांचे विश्लेषणात्मक उदाहरणे सांगितले. सारिका पाटील मॅडम यांनी दिशा प्रश्न पेढी यावर प्रश्न कशा प्रकारचे आधारित आहेत व उपयोजनात्मक अशा प्रकारचे आहेत व त्याचा व्यवहार वापर कसा होणार आहे असे समजून सांगितले तसेच प्रश्नपेढी चे उद्दिष्टे व महत्व समजावून सांगितले. तज्ञ मार्गदर्शिका उन्नती शिरगावकर यांनी स्वाध्याय उपक्रम आज संदर्भात माहिती दिली.
केंद्रशाळेचे मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे उद्दिष्टे व महत्त्व समजावून सांगितले.कोरोनाकाळात विद्यार्थी व पालक अस्थिर झाले आहेत त्यांना आपण सर्वांनी स्थिरता येण्यासाठी मदत करूया असे सांगितले. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला विज्ञानाच्या उपयोजित व्यवहारज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांनी केला तरच तो समर्थपणे आव्हाने पेलू शकणार आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयश्री सावंत, उत्तम कुंभार, रामराजे सुतार ,रोहिणी शेवाळे,वंदना खोत,प्रकाश गावडे व डाएटचे विषयतज्ञ आसमा पठाण, श्रावण कोकितकर,तमेजा मुजावर,अशोक जाधव सर ,ए के कांबळे सर यांचे सहकार्य लाभले व आभार पी आर पाटील यांनी मानले केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये 32 शाळेचे मुख्याध्यापक व 122 शिक्षक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment