कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.20/11/21
कोजिमाशि पत संस्थेने कोल्हापूर जिल्ह्यातील ५०६ कोविड संसर्ग शिक्षक सभासदांना प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे २५ लाखाचा मदत निधी दिला. तसेच संस्थेच्या वतीने माफक व्याजदरात मोठ्या रक्कमेचे कर्ज दिले जाते. शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या सहकार अभ्यासातून विविध उपक्रम सभासद हिताचे राबिवले जात आहेत,संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे कौन्सील सदस्य तथा अध्यक्ष विनोद कुमार लोहिया यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर अंतर्गत कोजिमाशि महिला सखी मंचच्या वतीने निबंध व गायन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण , लाभार्थी सभासदाना कोविड आधार भेट समारंभ, राजर्षि शाहू महाराज सभागृह मुख्याध्यापक संघ, कोल्हापूर येथे संपन्न झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
कोजिमाशि तज्ञ संचालक शिक्षक नेते दादासाहेब लाड म्हणाले कोजिमाशि पतसंस्थेची सत्ता हाती घेतली त्यावेळी संस्थेमध्ये ३२ कोटी ठेवी होत्या. सतरा वर्षाच्या कार्य कालामध्ये ४७१ कोटी ठेवी संस्थेत जमा झाल्या आहेत. पहिला संस्थे मार्फत दहा ते बारा टक्के लाभांश दिला जायचा. सत्ता आल्यापासून २१ ते २४ टक्के लाभांश दिला जातो तसेच संस्थेस ऑडीट अ वर्ग मिळाला आहे. ११ कोटी रुपयांचे मयत सभासद कर्ज माफ केले आहे. सभासदांच्या हिताचे निर्णय घेतल्याने संस्थेवर सभासदांची नितांत निष्ठा आहे.या प्रसंगी प्राचार्य डी.एस. घुगरे यांनी मनोगत व्यक्त केले.पाहुण्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
गायन स्पर्धा - विजेते - प्रथम आशा कृष्णा गुरव ( व्यंकटराव हाय. आजरा), द्वितीय स्मिता विक्रम कदम ( कुमार भवन करडवाडी), तृतीय सुचिता विठ्ठल पाटील ( श्री बालाजी माध्य. विक्रमनगर इचलकरंजी), तृतीय अर्चना प्रशांत अंबिलधोक (तात्यासो तेंडुलकर ज्युनि. कॉलेज कोल्हापूर ), चतुर्थ अनुराधा दत्तात्रय जंगम ( लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स हाय. जयसिंगपूर), पाचवा रूपाली प्रताप पोवार ( शाहु कुमार भवन गारगोटी )
निबंध स्पर्धा - प्रथम सुमन नरुटे ( माध्यमिक वि. हातकणंगले) द्वितीय अस्मिता पुंडपळ ( व्यंकटराव हाय.आजरा ) तृतीय वैशाली वडवळेकर ( व्यंकटराव हाय. आजरा) चतुर्थ सुकेशा चौगुले ( दानोळी हाय. दानोळी ) पाचवा क्रमांक प्रविणा पाटील ( आर. के. वालावलकर प्रशाला कोल्हापूर)
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कोजि माशि संचालक अनिल चव्हाण यांनी केले.या प्रसंगी गायन व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण कोविड संसर्ग शिक्षकांना धनादेश व कर्जमाफी दाखले वितरण करण्यात आले.
या प्रसंगी चेअरमन बाळासाहेब डेळेकर, प्राचार्य डी. एस. घुगरे, सिईओ अरविंद पाटील, मुख्याध्यपक संघ सदस्य रविंद्र मोरे, जितेंद्र म्हैशाळे, प्रकाश पोवार, एस. एस. चव्हाण, सारीका यादव, अनिता नवाळे, प्रा. एच. आर. पाटील, राजेद्र रानमाळे, संजय डवर, सुलोचना कोळी, के एस. खाडे,शांताराम तौवंदकर अनिल चव्हाण, एस डी पाटील, जनार्दन गुरव, प्रकाश चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.आभार व्हा चेअरमन एस.डी. पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन निशा साळोखे व उत्तम कवडे यांनी केले.
कोल्हापूर : गायन व निबंध स्पर्धेतील विजेत्या शिक्षिकांच्या सोबत शिक्षक नेते दादासाहेब लाड चेअरमन बाळासाहेब डेळेकर व्हा.चेअरमन एस डी पाटील प्राचार्य डी. एस. घुगरे आदीसह अन्य मान्यवर.
शिक्षणतज्ञ कै. डी. बी. पाटील यांची मुख्याध्यापक संघावर ५३ वर्षे सत्ता होती.त्यांच्या पवित्र कार्याचा वसा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करीत अहोत.
दादासाहेब लाड
शिक्षक नेते तथा तज्ञ संचालक कोजिमाशि
No comments:
Post a Comment