Saturday, 27 November 2021

शिक्षक बँकेच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल या रिक्त जागेवर महिला गटाची जागा आरक्षित करण्याची मागणी

कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.२७/११/२१

शिक्षक बँकेच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल या रिक्त जागेवर महिला गटाची जागा आरक्षित करा अशी मागणी  दि.प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूरच्या
संचालिका  सौ.लक्ष्मी पाटील यांनी सहकार आयुक्त महाराष्ट्र शासन पुणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
        दि. प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूर या बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपून दोन वर्षे होत आले आहेत. सध्या निवडणूक लावण्याचा कार्यक्रम सहकार खात्याने सुरू केला आहे. दि. प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूर ही सर्व कोल्हापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक सभासद असणारी बँक आहे त्यामुळे एकूण सर्व सभासद पैकी एकही सभासद आर्थिक दृष्ट्या दुर्बल या गटात समाविष्ट होऊ शकत नाही. शिक्षक बँकेच्या सभासदांच्या संख्येनुसार बँकेत एकूण १८ संचालक मंजुरी आहे. मात्र आर्थिक दृष्ट्या दुर्बल या घटकात कोणीही सभासद नसल्यामुळे ती जागा रिक्त राहत आहे. 
       या उलट इतर कोणतेही संस्थे पेक्षा महिलांची सभासद संख्या ही जवळपास ५० टक्के असताना बॅंकेची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत आरक्षित दोन जागेवर महिला संचालक निवडून येत आहेत. तरी रिक्त राहणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल जागे ऐवजी  ती जागा महिला आरक्षित करून वाढवावी, जेणेकरून सभासदांच्या प्रमाणात थोडेफार महिलांना संचालक मंडळामध्ये स्थान मिळेल अशी मागणी दि. प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापुर च्या संचालिका सौ. लक्ष्मी पाटील यांनी  आयुक्त सहकार खाते महाराष्ट्र शासन पुणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.

        फोटो 
पुणे सहकार आयुक्त अनिल कवडे यांना दि. प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापुर च्या संचालिका सौ. लक्ष्मी पाटील लेखी निवेदन देतांना.

No comments:

Post a Comment