Sunday, 26 December 2021

मौजे वडगाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम बंद पाडले. गावठाण पासून रस्ता सुरु करावा या मागणीवर शेतकरी ठाम .

हेरले /प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील गावठाण ते पाझर तलाव रस्ता गावठाणपासून सुरू न केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम बंद पाडले. या अगोदर गावातील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता यांना रस्ता गावठाणपासून सुरु करावा अशा मागणीचे लेखी निवेदनही दिले होते. परंतु ठेकेदाराने आपली मनमानी करीत ठिकाणी अर्धवट रस्ता सुरू केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पडलेल्या खडी व मुरुमाचा भरावा पास करून ऊस वाहतूक करणे जिकिरीचे झाले आहे. सदर रस्त्यावर याअगोदर उसाची वाहने पलटी झाली असून वाहनांचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ठेकेदारांना फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली आहे .
          सदर रस्त्याची सुधारणा ही गेल इंडिया कंपनीच्या सीएसआर फंडातून होत आहे. ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार गावठाण ते पाझर तलाव रस्ता करण्याचे ठरले असून सदर कामाची वर्कऑर्डर तशीच आहे. परंतु गावापासून पाचशे ते सातशे मीटर अंतर सोडून रस्त्याचे काम पुन्हा सुरू केले आहे .त्यामुळे वर्क ऑर्डर नुसार काम न केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रस्त्याचे काम बंद पाडले .तसेच सुरुवातीपासून काम चालू करा अन्यथा काम करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला.
        यावेळी मनोहर चौगले, बाळासो थोरवत, शिवसेनेचे शहर प्रमुख सुरेश कांबरे, विलास सावंत, भुपाल चौगुले ,गुणधर परमाज, विलास येलाज, शितल परमाज, तानाजी सावंत ,स्वप्नील चौगुले, बाळासो पाटील, गणपती कदम, दगडू थोरवत, अमर सावंत, यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

         प्रतिक्रिया
 गावठाण ते पाझर तलाव रस्ता गावठाण पासून सुरु करावा सुरुवातीपासून रस्ता चालू न केल्यास पुढचा रस्ता सुरू करू देणार नाही .
   मनोहर चौगले - शेतकरी

        प्रतिक्रिया
 ठेकेदार जरी रस्त्या संदर्भात वर्क ऑर्डर नुसार रस्त्याचे काम करीत नसेल व प्रशासनाचा  आदेश मानत नसेल तर त्या ठेकेदाराला काळया यादीत  टाका. 
    माजी उपसरपंच सुरेश कांबरे -शिवसेना शहर प्रमुख
 
 
हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगांव येथील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रोलर आडवून रस्त्याचे काम बंद पाडले.

No comments:

Post a Comment