हेरले / प्रतिनिधी
स्पर्धा परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल आणि होत असलेली गर्दी लक्षात घेता त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना सातत्य आणि चिकाटी ठेवणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी काढले.
शिये (ता.करवीर) येथील ग्रामपंचायत आणि तंटामुक्त समिती यांच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या एमपीएससी प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच रेखाताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील प्रमुख उपस्थित होते.
सपोनि खांडवे म्हणाले, गेल्या काही वर्षापासून स्पर्धा परीक्षेचे स्वरूप बदलले आहे.मात्र या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विध्यार्थ्यांचा टक्का देखील वाढलाय. या स्पर्धा परीक्षेत करवीर तालुक्याचा टक्का इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी असल्याने हा टक्का वाढण्यासाठी शिये ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती आणि गावातील सर्व संस्थांच्या वतीने ज्ञानेश्वरी हॉल येथे एमपीएससी प्रशिक्षण, मार्गदर्शन वर्गाची सुरुवात करणे गौरवास्पद आहे.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, नव्याने नियुक्त झालेले पोलीस उपधीक्षक विपुल पाटील, तहसिलदार संदीप पाटील यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील यशाचा कानमंत्र दिला. या प्रशिक्षण वर्गास ४० हून अधिक विध्यार्थी उपस्थित होते.
यावेळी पोलीस पाटील मनीषा सिसाळ, हनुमान सेवा संस्थेचे माजी चेअरमन हणमंत पाटील, महादेव दूध संस्थेचे चेअरमन किरण चौगले ,प्रभाकर काशिद, तेजस्विनी पाटील, उत्तम गाडवे, पिलाजी मगदूम,शहाजी काशीद, जगन्नाथ बुगले, बाळासाहेब माने,यशवंत मगदूम, प्रकाश पाटील प्रवीण चौगले, आप्पासो सिसाळ आदीसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रास्तविक जालिंदर शिंदे यांनी केले. सुत्रसंचलन आसिफ पठाण यांनी केले.तर आभार विश्वास चरणकर यांनी मानले.
................................
फोटो : शिये : येथील एमपीएससी मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन करताना सपोनि राजेश खांडवे, सरपंच रेखाताई जाधव , तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील व इतर मान्यवर.
No comments:
Post a Comment