Saturday, 1 January 2022

शंभर टक्के शाळा 'अ' श्रेणीत आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहूया - माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर

हेरले / प्रतिनिधी

कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करून कोविडवर मात करून, आरोग्य जपूया. तसेच नव नविन तंत्रज्ञानाचा वापर करून शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन करू. शाळा सिद्धी क्षेत्रे व त्यातील मानकांचे पालन करून शंभर टक्के शाळा 'अ' श्रेणीत आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहूया अशा संकल्पना राबविण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर यांनी नविन वर्षानिमित्त माध्यमांशी बोलत असतांना कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाचा नव वर्षाचा शैक्षणिक संकल्प स्पष्ट केला.
        माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर म्हणाले, माध्यमिक शिक्षकांनी नवनविन तंत्रज्ञानाचा दैनंदिन अध्यापनात शैक्षणिक साधनासह जास्तीत जास्त वापर करीत ज्ञान अनुभूती द्यावी. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी सतत प्रयत्तशील राहावे.शाळेची सिध्दी क्षेत्रे मानाकन शंभर टक्के करून सात क्षेत्रे त्यांच्यातील ४६ मानके याचा अभ्यास करून अमलबजावणी करावी. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा 'अ' श्रेणी आणण्यासाठी प्रयत्न करावेत.
        जिल्हयातील प्रत्येक शाळेने आपली विशिष्ट ओळख निर्माण होण्यासाठी एका प्रकारच्या क्रीडा प्रकारामध्ये विशिष्ट नैपुण्य आणण्यासाठी विद्यार्थ्यांना घडवावे. त्यामुळे ते विद्यार्थी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात आपल्यासह शाळेचे नाव लौकीकास प्राप्त करतील. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी सहशालेय उपक्रमांना जास्तीत महत्त्व द्यावे.

No comments:

Post a Comment