Tuesday, 11 January 2022

मौजे वडगाव येथील रस्ता गावठाण पासून सुरु करा. खा. धैर्यशील माने व जि. .प .च्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांचे बांधकाम विभागाला लेखी पत्र.

     हेरले /प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील गेल इंडिया कंपनीच्या सी एस आर फंडातून होणारा रस्ता गावठाण पासून सुरु करावा असे लेखी पत्र खासदार धैर्यशील माने व जि .प.च्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी शेतकर्‍यांच्या वतीने जि .प .चे कार्यकारी अभियंता महेद्र क्षीरसागर यांना दिले. 
       मौजे वडगाव येथील गावठाण पासून मंजूर असणारा रस्ता व कामाची तशी वर्क ऑर्डर असूनही ठेकेदाराने चारशे ते पाचशे मीटर सोडून पुढचा रस्ता सुरू केल्याने गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रस्त्याचे काम बंद पाडले आहे. जोपर्यंत गावठाणपासून रस्ता सुरू करत नाही. तोपर्यंत काम करू न देण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे .सदर ठेकेदाराने रस्त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री घेऊन गेले असून रस्त्याचे काम अर्धवटच सोडले आहे. त्यामुळे वर्क ऑर्डर व ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार रस्त्याचे काम गावठाण पासून सुरु करावे यासाठी खासदार धैर्यशील माने व जि.प. च्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी लेखी पत्रे बांधकाम विभागाला दिले आहेत. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सुरेश कांबरे, बाळासो थोरवत, ग्रामपंचायत सदस्य अविनाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील खारेपाटणे, अमोल झांबरे, उपस्थित होते. 

फोटो 
   मौजे वडगाव येथील गावठाण पासून रस्ता सुरु करावा यासाठी खासदार धैर्यशील माने व शौमिका महाडिक यांचे लेखी पत्र शेतकर्‍यांच्या वतीने देताना सुरेश कांबरे, बाळासो थोरात,अविनाश पाटील ,सुनील खारेपाटणे, व इतर मान्यवर.

No comments:

Post a Comment