हेरले / प्रतिनिधी
हातकणंगले तालुका ग्रामपंचायत कामगार संघाच्या वतीने हातकणंगले पंचायत समिती गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करून पेन्शन, ग्रॅज्युवटी याचा लाभ देण्यात यावा,इतर जिल्ह्याप्रमाणे वेतनाची आर्थिक तरतूद करावी, ग्रामपंचायतीकडून विशेष भत्ता थकबाकी अदा करण्यात यावी,ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जाचक असलेला आकृती बंध रद्द करून शासन निर्णया प्रमाणे वेतन देण्यात यावे,विशेष राहणीमान भत्ता मिळावा या मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी आप्पासो रयत ,सुनील चावरेकर, संजय खाबडे, राहुल निंबाळकर,संदीप लोखंडे, दिलीप जाधव,राजेश सोळंकी, रणजीत खाबडे, संजय कोळी, सचिन लोहार,विष्णू खोत, नानासो खोत उपस्थित होते.
No comments:
Post a Comment