हेरले / प्रतिनिधी
खासदार धैर्यशील माने यांची मागणी मान्य
अतिग्रे येथील ऐतिहासिक शाहू तलावाचे सुशोभिकरणाचे काम दोन महिन्यांत सुरू करणार.नाम.आदित्य ठाकरे
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मौजे अतिग्रे (ता.हातकणंगले) येथील ऐतिहासिक शाहू तलावाचे संवर्धन करून सुशोभिकरण करण्याची मागणी खासदार धैर्यशील माने यांनी राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती.
खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या मागणीनुसार रविवारी पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी खासदार धैर्यशील माने यांच्या समवेत अतिग्रे येथे तलावास भेट देऊन पाहणी केली व खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीनुसार येत्या आठ दिवसात याबाबत बैठक घेऊन दोन महिन्यांच्या आत तलाव संवर्धनाचे काम सुरू करणार असल्याची घोषणा केली.
यावेळी अतिग्रे गावचे सरपंच सागर पाटील, पांडुरंग पाटील, प्रशांत गुरव, जयवंत पाटील,दीपक पाटील, विद्याधर लाटवडेकर, धनाजी पाटील,नीलेश पाटील, शशिकांत पाटील, आनंद पाटील , धुळोबा पाटील,संतोष कांबळे, किशोर बोरगावे, प्रवीण पाटील, भगवान पाटील,अविनाश बनगे, बबलू मकानदार, अमोल लोखंडे, अरविंद खोत, कार्तिक स्वामी, सारंग पाटील यांच्यासह अतिग्रे रुकडी पंचक्रोशीतील शिवसैनिक युवासैनिक व नागरिक उपस्थित होते.
फोटो
अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील शाहू तलाव ठिकाणी खासदार धैर्यशील माने राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या समवेत पाहणी करतांना.
No comments:
Post a Comment